आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Commissioner Kendrekar Control On Waste Money

आयुक्त केंद्रेकरांचा उधळपट्टीला चाप, एसयूव्ही घेण्याची फाइल फेटाळली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - प्रभारी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी महापालिकेत या ना त्या कारणाने होत असलेली उधळपट्टी रोखण्याचा प्रयत्न केला असून १५ लाखांची एसयूव्ही घेण्याचा तसेच फवारणीचे खासगीकरण थांबवून कोट्यवधी रुपये वाचवले आहेत.

महापालिकेची तिजोरी हलाखीची असतानाही मोठ्या प्रमाणावर उधळपट्टी होत असते. ती रोखण्यासाठी प्रभारी आयुक्त केंद्रेकर यांनी प्रयत्न केले. अनेक अवाजवी खर्चांना कात्री लावत त्यांनी मनपाचे काही कोटी रुपये वाचवले आहेत. केंद्रेकरांनी अधिकाऱ्यांचे कोणत्या तरी कारणासाठी प्रशिक्षण असे स्वरूप असलेले अभ्यास दौरे बंद करत याची सुरुवात केली. त्यानंतर वाहनांच्या उधळपट्टीवर नजर रोखली. मनपाच्या ताफ्यात पुरेशा गाड्या असताना शिवाजी पाटील झनझन यांच्यासाठी १५ लाख रुपयांची एसयूव्ही खरेदी करण्याचा प्रस्ताव आला होता. आयुक्तांनी ती फाइलच फेटाळून लावली. एवढेच नव्हे, तर आयुक्तांसाठी असलेली इनोव्हा आपण वापरत नसल्याने ती कुणा अधिकाऱ्याला हवी असल्यास त्यांनी वापरावी, असे सांगत एसयूव्हीचा प्रस्ताव नाकारला. सिद्धार्थ उद्यानातही प्राण्यांची सचित्र माहिती देणारे फ्लेक्स तयार करण्यासाठी तीन लाख रुपये खर्चाच्या कामाची फाइल आयुक्तांनी फेटाळली. मनपा शाळांतील शिक्षकांकडून प्राण्यांची चित्रे काढून घ्या, असेही सुचवले.

मनपाची मोठी बचत
याशिवाय सर्वात मोठी बचत झाली ती फवारणीच्या कामात. शहरातील २० वॉर्डांत फवारणीचे काम खासगी ठेकेदारांना देण्यात आले होते. त्यांच्या कामाबाबत सातत्याने होणाऱ्या तक्रारी ध्यानात घेत हे कंत्राटच रद्द करण्यात आले आहे. आता त्यांच्या जागी मनपाचे १०७ कर्मचारी हे काम करणार आहेत. त्यामुळे मनपाचे जवळपास सात कोटी रुपये वाचले आहेत.