आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Commissioner\', Latest News In Divya Marathi

महत्त्वाचीच कामे करू- आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- प्रशासनाने उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ घालत सादर केलेला 549 कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समिती व सर्वसाधारण सभा यांच्या सुधारणांमुळे 790 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. जवळपास 240 कोटी रुपयांनी वाढलेल्या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करताना कामांचा प्राधान्यक्रम ठरवण्याशिवाय पर्याय नसल्याचे मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी खास ‘दिव्य मराठी’शी बोलताना म्हटले आहे. हे करताना स्पिल ओव्हरच्या कामांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

तोळामासा आर्थिक स्थिती असलेल्या महानगरपालिकेचा फुगवलेला अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेने फारशी चर्चा न करता मंजूर केला. आगामी मनपा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून वॉर्डावॉर्डांत कामांची खिरापत वाटणार्‍या या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करणे मनपा प्रशासनाला अशक्य असल्याचे प्रथमदर्शनीच दिसते. असे असतानाही अर्थसंकल्प रेटून नेल्याने आगामी काळात कामे होणे अवघड दिसत आहे.

मनपा प्रशासन या अर्थसंकल्पाबाबत काय भूमिका घेणार आहे, अर्थसंकल्प व्यवहार्य करण्यासाठी काय पावले उचलली जातील हे जाणून घेण्यासाठी ‘दिव्य मराठी’ने मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्याशी बातचीत केली. त्यात त्यांनी तारेवरची कसरत करावी लागणार असल्याचे मान्य करीत जास्तीत जास्त कामे करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगितले. अंतर्गत रस्ते, ड्रेनेज, दिवे यांसारखी स्पिल ओव्हरमधील कामे प्राधान्याने केली जातील, असे त्यांनी सांगितले.