आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन शॉपिंगमुळे मनपाचा 20 कोटी महसूल बुडाला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- महानगरपालिका हद्दीत दररोज ५० ते ६० लाख रुपयांची ऑनलाइन शॉपिंग होते. मात्र, त्याची कोणतीच नोंद मनपाकडे नाही. त्यामुळे मनपाचा दररोज दीड ते दोन लाख रुपये याप्रमाणे वर्षभरात अंदाजे २० कोटी रुपये महसूल बुडत आहे.

त्यामुळे मनपाने थेट कारवाई करीत 10 ठिकाणी छापे टाकून दोन कोटी रुपयांचे डाक जप्त केले आहेत, अशी माहिती मनपा आयुक्त प्रकाश महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली. १४ ऑनलाइन शॉपिंग आणि कुरियर सेवा देणाऱ्यांची माहिती मनपाकडे आहे. त्यापैकी फ्लिपकार्ट व स्टार सीजे या कंपन्यांनी नोंद करून या वर्षात ४४ लाख ३८ हजार ६२७ रुपये जमा केले आहेत. उर्वरित एजन्सीकडून कर न भरल्याने मनपाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. त्यामुळे मनपाने १८१ पार्सल जप्त केले आहेत. त्यात मोबाइल, लॅपटॉप, गॉगल, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश आहे. या वस्तू जप्त करून संबंधित एजन्सींना मनपाने नोटीसही बजावली आहे. सात दिवसांत त्यांनी नोंदणी करून मागील व आताचा कर भरण्याची सूचना केली आहे. भविष्यात मोबाइल सर्व्हिस देणाऱ्या कंपन्या व एजन्सींवरही लक्ष ठेवणार असून त्यासाठी सायबर क्राइम व तज्ज्ञांची मदत घेतली जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. त्याचबरोबर सर्व एजन्सीजशी बोलून एकाच ठिकाणाहून वस्तू देवाणघेवाण कार्यालय सुरू करण्याचे आवाहन केले जाणार असल्याचे महाजनांनी सांिगतले. या वेळी शहर अभियंता सखाराम पानझडे, उपायुक्त किशोर बोर्डे, अय्युब खान यांची उपस्थिती होती.