आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झनझन यांच्यावर घनकचऱ्याचा भार, मनपा आयुक्त केंद्रेकरांनी केला खांदेपालट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मनपा आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मनपात प्रशासनाला शिस्त लावण्याचे काम दणक्यात सुरू केले असून त्याचा एक भाग म्हणून आज मुख्य अग्निशमन अधिकारी शिवाजी झनझन यांच्याकडे उपायुक्त रवींद्र निकम यांच्याकडील घनकचरा विभाग सोपवण्यात आला आहे, तर निकम यांच्याकडे अतिक्रमण हटाव विभागासोबतच शिक्षण विभागही देण्यात आला आहे.
दोन दिवसांपूर्वी रस्त्यांच्या कामात लक्ष घातल्यानंतर आज आयुक्तांनी आरोग्य घनकचरा या दोन विभागांकडे लक्ष दिले. त्यांनी झनझन यांच्याकडे घनकचरा विभाग सोपवला. एवढेच नव्हे तर घनकचरा निर्मूलनाबाबत काय करणार आहात, याचा अॅक्शन प्लॅन झनझन यांच्याकडे मागितला आहे.

आयुक्तांच्या आदेशानंतर दुपारीच झनझन यांनी घनकचऱ्याबाबत विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. त्यात तत्काळ उद्यापासून करायच्या कामांबाबत चर्चा झाली कचरा निर्मूलनाबाबत रणनीती ठरवण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर तत्काळ दंडाची कारवाई करण्यात येणार अाहे. व्यावसायिकांवर आधी लक्ष केंद्रित केले जाणार आहे. शहरातील हाॅटेल्स, मंगल कार्यालये, दुकाने लक्ष्य करण्यात येणार आहेत. त्यांना त्यांच्या प्रतिष्ठानांतच ओल्या सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्यास सांगण्यात येणार आहे. हाॅटेल्स, मंगल कार्यालये, दुकानांमुळेच शहरात मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होतो. धडक कारवाईच्या तयारीनेच माेहीम राबवली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दोनकर्मचाऱ्यांना नोटिसा
दरम्यान,आज केंद्रेकरांनी आरोग्य विभागाचीही झाडाझडती घेतली. दुपारी त्यांनी सिडको कार्यालयात आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यांना साथरोग नियंत्रणाबाबत काय करण्यात येत आहे याची माहिती जाणून घेत काही सूचनाही केल्या. त्याआधी आज आयुक्तांनी न्यायनगर भागाला भेट दिली. या भागात डेंग्यूची साथ असून तेथे त्यांना काही रुग्णही आढळले. याशिवाय या भागात धूरफवारणीबाबत दुर्लक्ष होत असल्याचेही दिसून आले. यानंतर त्यांनी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. सुहास जगताप यांना संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार एक पर्यवेक्षक एक आरोग्य सेवकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

निकम यांच्याकडे शिक्षण
उपायुक्तबी.एल. जाधव हे पुन्हा शासनाच्या सेवेत परत गेल्याने त्यांच्याकडील शिक्षण विभागाची जबाबदारी आता निकम यांच्याकडे देण्यात आली. निकम यांनी घनकचरा विभाग सांभाळताना केलेल्या कामाबद्दल आयुक्त केंद्रेकर यांनी नाराजी व्यक्त केली होती.