आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा आयुक्तांच्या कामावर पदाधिकारी नाराज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी 7 फेब्रुवारी 2013 रोजी कारभार हाती घेतला. यानंतर ते पालिकेच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करूनच योग्य त्या कामांना मंजुरी देत आहेत. दौर्‍यावर जाणे, फोन न घेणे, फायलींवर स्वाक्षरी न करणे, पदाधिकार्‍यांना भेट टाळणे यामुळे बहुतांश पदाधिकारी त्यांच्याविषयी नाराजीचा सूर आळवत आहेत.

मागील चार दिवसांपासून एक आमदार आयुक्तांची भेट घेण्यासाठी त्यांचा शोध घेत आहेत, पण त्यांची आयुक्तांशी भेट होऊ शकली नाही. कांबळे आजारी असल्याने 17 जूनपासून ते आराम करत आहेत. 23 जून रोजी ते कामानिमित्त मुंबईला रवाना झाले. गेल्या सहा दिवसांपासून ते मनपा कार्यालयात आले नाहीत. त्यामुळे पदाधिकार्‍यांना आल्या पावली माघारी फिरावे लागले. यामुळे सर्वांमध्ये नाराजी दिसून येत आहे.

आयुक्तांशी संपर्क नाही : महापौर आयुक्तांची प्रकृती बरी नव्हती. त्यामुळे ते कार्यालयात आले नाहीत. तसे पत्र मला प्राप्त झाले आहे. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 23 जून रोजी ते कामानिमित्त मुंबईला जाणार होते, अशी माहिती महापौर कला ओझा यांनी पत्रकारांना दिली. त्या म्हणाल्या, रखडलेल्या 30 कोटींच्या कामाविषयी माहिती घेऊन ठेकेदारांना काम पूर्ण करण्याचे आदेश दिले जातील. रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. लवकरच ते मुरूम टाकून बुजवण्यात येणार आहेत. मात्र, डांबरीकरणाची कामे दिवाळीनंतरच सुरू होतील. क्रांती चौक ते रेल्वेस्टेशनपर्यंत सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू झाले असल्याचेही ओझा म्हणाल्या.