आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation Absent Worker Salary Stop Aurangabad

अंगठय़ांमुळे रखडला महापालिकेतील 728 कर्मचार्‍यांचा पगार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मनपातील दांडीबहाद्दर कर्मचार्‍यांना चाप लावण्यासाठी थंब इम्प्रेशनचा अहवाल आल्याशिवाय वर्ग 1 ते 3 च्या कर्मचार्‍यांचे पगार न करण्याचे आदेश मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिल्याने 728 कर्मचार्‍यांचे पगार होऊ शकले नाहीत. मात्र, वर्ग 4 च्या कर्मचार्‍यांचे पगार देण्यात आले.

मनपातील कर्मचार्‍यांच्या हजेरीसाठी थंब इम्प्रेशन मशिन्स बसवण्यात आल्या आहेत. मनपा मुख्यालयाच्या दोन्ही इमारतींत प्रत्येकी 3 तर वॉर्ड कार्यालयांत प्रत्येकी 2 अशी 18 यंत्रे बसवण्यात आली आहेत. दांडीबहाद्दर कर्मचारी या यंत्रांवर हजेरी नोंदवतच नाहीत, असे ध्यानात आल्याने मनपा आयुक्तांनी गंभीर दखल घेतली. जोपर्यंत थंब इम्प्रेशनचा अहवाल येत नाही तोपर्यंत पगार द्यायचे नाहीत, असे आदेश त्यांनी काढले. चतुर्थ र्शेणी कर्मचार्‍यांना मात्र यातून वगळण्यात आले आहे.

मुख्य लेखाधिकारी अशोक थोरात यांनी सांगितले की, आज चतुर्थ र्शेणी कर्मचार्‍यांचे वेतन करण्यात आले. थंब इम्प्रेशनचा अहवाल आल्यावर उर्वरित 728 कर्मचार्‍यांचा पगार करण्यात येईल. आस्थापना अधिकारी अय्युब खान म्हणाले की तांत्रिक अडचणीमुळे काही कर्मचार्‍यांचे ठसे या यंत्रांवर येत नाहीत. त्यांना कार्ड देण्यात येणार आहेत. या कार्डमुळे एक कर्मचारी अनेकांच्या हजेरी लावू शकत असल्याने आय रेटीना अर्थात डोळ्यांची बुबुळे तपासणारे कार्ड देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.