आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छावणीकडे ४.३४ कोटींची पाणीपट्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पाणीपट्टी वसुली केली नाही म्हणून मनपाने समांतरच्या कंत्राटदाराला नोटीस बजावल्याने समांतरने नागरिकांकडून वसुली सुरू केली आहे. पाणीपट्टी वसुलीचे काम समांतरचे असतानाही छावणी बोर्डाकडील चार केाटी ३४ लाख रुपयांची थकीत पाणीपट्टी वसूल करण्यासाठी मनपाने छावणीला पत्र पाठवले आहे.
त्यामुळे समांतरच्या सोयीसाठीच मनपा वसुलीचे काम करत असल्याची चर्चा सध्या महापालिकेत रंगली आहे. "स्मार्ट सिटी'साठी आवश्यक ५० कोटी रुपये उभारण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी विविध करांची वसुली करण्याची तयारी केली आहे. मात्र, या कामात कर्मचारी अधिकारी वेळ मारून नेत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला होता. त्यात काही अधिकारी हिरीरीने भाग घेत असले तरी निधी उभारण्याचे काम अत्यंत कठीण झाले आहे. ज्यांच्याकडे थकबाकी आहे त्यांना नोटिसाही दिल्या जात नसल्याचे उघड झाले आहे, तर दुसरीकडे समांतरला मदत करण्यासाठी
महानगरपालिकेच्या वतीने छावणीला पत्र देण्यात आले आहे. शहरातील अथवा जायकवाडीतून येणाऱ्या पाण्याची पाणीपट्टी वसुलीची जबाबदारी समांतरकडे असताना मनपासुद्धा समांतरसाठी वसुली करीत आहे.

मनपाचा ४८ टक्के वाटा
समांतरकडून वसूल करण्यात येत असलेल्या पाणीट्टीतून महानगरपालिकेला ४८ टक्के वाटा मिळतो. मात्र, वसुली समांतरला करावी लागते. छावणीकडून मिळणाऱ्या पाणीट्टीची रक्कम समांतर मनपाच्या जॉइंट खात्यात जमा करणार असली तरी मनपाच्या हिश्श्याचीच रक्कम मनपाला काढता येणार आहे.