आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा बजेटमध्ये दोन कोटी वाया घालवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- टेलिकाॅम कंपन्यांना रस्ते खोदायला परवानगी दिल्यानंतर त्यांच्याकडूनच या खोदकामानंतरची दुरुस्ती केल्याने मनपाला रस्ते दुरुस्तीसाठी थोडेथोडके नव्हे, तर कोटी लाख ३१ हजार रुपये लागणार आहेत. कहर म्हणजे त्यासाठी अर्थसंकल्पात स्पिल ओव्हरच्या कामांत ही कामे घुसडून तरतूद मागण्यात आली आहे.
महापालिकेचा २०१५-१६ चा अर्थसंकल्प गेल्या शुक्रवारी मनपा आयुक्त प्रकाश महाजन यांनी स्थायी समितीसमोर सादर केला. या अर्थसंकल्पात सरकारकडून येण्याची अपेक्षा असलेल्या निधीची कल्पना करून हा अर्थसंकल्प फुगवण्यात आल्याचे त्याच दिवशी "दिव्य मराठी'ने आकडेवारी नोंदीनिशी प्रकाशित केले होते. अर्थसंकल्पातील पोकळपण सिद्ध करणाऱ्या अनेक बाबी या पुस्तिकेच्या पानोपानी दडल्या आहेत.

हा अर्थसंकल्प तयार करताना स्पिल ओव्हरचीच कामे दाखवण्यात आली असल्याने नवीन कामांचा तसा उल्लेखच नाही. "दिव्य मराठी'ने या कामांचा तपशील तपासला असता अनेक कामे विनाकारण आगामी काळात स्थायी समिती सर्वसाधारण सभेला कामे घुसवण्यासाठी फट ठेवावी म्हणूनच घुसवल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या अर्थसंकल्पावर वित्त विभागापेक्षा अभियांत्रिकी विभागाचाच पगडा अधिक दिसून येत असल्याने कोणत्याही कामांसाठी बेधडक तरतूद करण्यात आल्याचे समोर आले आहे.

याचेच ठळक उदाहरण म्हणजे आॅप्टिक फायबरसाठी खोदकाम झाल्यानंतर करावयाचे रस्ता दुरुस्तीचे काम मनपाने आपल्या अंगावर ओढवून घेतले आहे. आतापर्यंत शहरात रिलायन्स, एअरटेल इतर कंपन्यांनी त्यांच्या आॅप्टिक फायबर लाइन टाकण्यासाठी मनपाकडे परवानगीच पैसे भरले होते. यापोटी मनपाला मागील काळात ७० कोटींच्या आसपास कमाई झालेली आहे. ही परवानगी देताना कंपनीने खोदकाम केलेल्या जागेचीही दुरुस्ती करून देणे करारानुसार बंधनकारक आहे. असे असताना संबंधित कंपन्यांकडून ते काम करून घेतल्याने महापालिकेला मोठा भुर्दंड बसला आहे.