आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation Comeessinor Notice Mumbai Court

मनपा आयुक्तांना खंडपीठात हजर राहण्याचे आदेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - दूषित पाणीपुरवठा प्रकरणी खंडपीठात दाखल अवमान याचिकेत महापालिका आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर 17 जुलै रोजी यांना व्यक्तिश: सुनावणीस हजर राहण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती संभाजी शिंदे यांनी शुक्रवारी दिले आहेत.
शहरातील नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होतो. ही बाब स्पष्ट करणारा त्रिसदस्यीय समितीचा अहवाल याचिकाकर्त्यांचे वकील अँड. प्रदीप देशमुख यांनी यापूर्वीच्या सुनावणीप्रसंगी सादर केला होता. त्याची प्रत आयुक्तांच्या वकिलांनाही देण्यात आली. त्यानंतर आज पुन्हा ही याचिका सुनावणीस आली असता त्रिसदस्यीय समितीच्या अहवालावर मनपा आयुक्तांनी कुठलेही शपथपत्र दाखल केलेले नाही अथवा उपाययोजनेबाबत स्पष्टीकरण दिलेले नाही, ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. आयुक्तांतर्फे न्यायालयात बाजू मांडताना नोव्हेंबर ते फेब्रुवारीदरम्यानच्या पाणीपुरवठय़ासंदर्भात सविस्तर अहवाल दाखल करण्यात आलेला आहे. तसेच नव्या अहवालावर शपथपत्र दाखल करण्याची तयारी दाखवण्यात आली आहे. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून प्रकरणाची सुनावणी 17 जुलैला ठेवण्याचे आदेश दिले असून त्या वेळी आयुक्तांनी व्यक्तिश: उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकाकर्त्यांच्या वतीने अँड. प्रदीप देशमुख यांनी काम पाहिले. आयुक्तांतर्फे अँड. नंदकुमार खंदारे यांनी बाजू मांडली.