आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा आयुक्त गोव्याच्या दौ-यावर, समांतरवरून होती गदारोळाची शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - समांतर जलवाहिनीच्या कामात फक्त डीआय पाइपच वापरायचे, असा निर्णय होऊनही १५३ कोटी रुपयांचा फायदा व्हावा म्हणून एचडीपीई पाइप वापरण्याबाबतचा प्रशासनाचा प्रस्ताव गुपचूप मंजूर करण्यात आल्याने शनिवारी पहिल्या सर्वसाधारण सभेत आयुक्तांसह प्रशासनाला व शिवसेनेला कोंडीत पकडण्याची तयारी करणा-या भाजप व एमआयएमच्या रणनीतीची हवाच गेली आहे. मनपा आयुक्त प्रकाश महाजन अचानक गोव्याला गेल्याने उद्याच्या सभेला ते उपस्थित राहणार नाहीत. परिणामी उद्याची सभा किती गाजते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

जानेवारी महिन्यात 'समांतर'वर बोलावण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत शिवसेनेसह सर्वच सदस्यांनी पाइपलाइनचे आयुर्मान व दर्जा ठेवण्यासाठी एचडीपीई पाइपऐवजी डीआय पाइपची आग्रही भूमिका घेतली होती. मात्र, नंतर मार्च महिन्यात प्रशासनाने एक ठराव घेत एचडीपीई वापरण्याचा निर्णय घेतला. हा ठराव सभागृहात आलाच नसल्याचे अनेक नगरसेवकांचे म्हणणे असून तत्कालीन महापौर व आयुक्तांच्या सहीने नंतर तो घुसडण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे. भाजपने हा विषय लावून धरला आहे. तिकडे एमआयएमनेही याच विषयावर प्रशासन व सत्ताधा-यांना धारेवर धरण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजपने तर शनिवारच्या सर्वसाधारण सभेत कोणी काय बोलायचे याचीही तयारी केली आहे. प्रशासनाचे प्रमुख म्हणून आयुक्त थेट निशाण्यावर येतात आणि "समांतर'चा व तत्कालीन महापौरांचा बचाव करण्याची वेळ आल्याने शिवसेनेलाही रोषाला तोंड द्यावे लागणार आहे. एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनीही आपल्या नगरसेवकांना या विषयावर मार्गदर्शन केले आहे. मात्र आता आयुक्तच सभागृहात नसल्याने 'समांतर'च्या विषयावरून रण माजवण्यात काहीच अर्थ राहणार नसल्याचे भाजप तंबूत बोलले जात आहे.

एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी एक पत्रकार परिषद घेत समांतर जलवाहिनीची अँटी करप्शनकडून चौकशी करण्याची मागणी केली. एचडीपीई पाइपचा निर्णय चर्चा न होता कसा मंजूर झाला, असा सवाल करीत समांतर चालवणारे शहर अभियंता सखाराम पानझडेच आहेत, असा आरोप केला.
बातम्या आणखी आहेत...