आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation Development Fund Issue Aurangabad

दिल्लीश्वरांपुढे मनपा पसरणार झोळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - भूमिगत गटार योजनेसाठी 379 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळावा तसेच रस्ते व इतर विकास योजनांसाठी पैसा देण्यात यावा, या मागण्यांसाठी औरंगाबाद मनपा आता दिल्लीश्वरांपुढे झोळी पसरत आहे. शुक्रवारी दिल्लीत नगरविकास मंत्रालयाच्या सचिवांना यासंदर्भात निवेदन देण्यासाठी महापौरांसह पदाधिकारी आणि आयुक्त भेटणार आहेत.

मध्यम व लहान शहरांना पायाभूत सुविधांसाठी मदत देण्यासाठी केंद्र सरकारची यूआयडीएसएसएमटी ही योजना आहे. या योजनेतून शहरात भूमिगत गटार योजना राबवण्यासाठी मनपाने केंद्रीय नगरविकास मंत्रालयाकडे धाव घेतली होती. या योजनेसाठी 379 कोटींचा प्रस्ताव मनपाने दिला होता. या निधीपैकी 90 टक्के हिस्सा केंद्र सरकार देणार असून 10 टक्के वाटा मनपाने उचलायचा आहे. या प्रस्तावाला राज्य आणि केंद्र सरकारने तत्त्वत: मान्यताही दिली होती. राज्य सरकारने ही योजना राबवण्याची शिफारस करणारे पत्रही दिले होते. मात्र, त्यानंतर हालचाली मंदावल्या.

शिष्टमंडळ रवाना
शिष्टमंडळ शुक्रवारी नगरविकास खात्याच्या सचिवांना भेटेल. सोबत खासदार चंद्रकांत खैरे असतील. शिष्टमंडळात महापौर कला ओझा, उपमहापौर संजय जोशी, स्थायी समिती सभापती नारायण कुचे, शिवसेनेचे सभागृह नेते सुशील खेडकर, विरोधी पक्षनेते डॉ. जफर खान, मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे आहेत.

युतीत समन्वयावरून धुसफूस
दिल्ली वारीवरून धुसफूस झाली. ‘दिल्ली’हून आलेल्या निरोपानुसार पदाधिकार्‍यांना निवडण्यात आले. त्यात एनडीएचे गटनेते गजानन बारवाल, भाजपचे गटनेते संजय केणेकर यांना डावलण्यात आले. त्यांना डावलून शिवसेनेने आणखी एकदा भाजपचा अपमान केला. केनेकर म्हणाले, गटनेता या नात्याने मला काहीही कल्पना देण्यात आली नाही. उलट ‘दिल्ली’हून सांगितले त्यांचीच तिकिटे काढली असे सांगण्यात आल्याचे नमूद करीत त्यांनी खैरे यांच्याकडे बोट दाखवले. शहराच्या विकासाचा प्रश्न असल्याने तुम्ही जा, असे सांगितल्याचे केणेकर म्हणाले. दुसरीकडे गजानन बारवाल हेही नाराज असून मी पण गटनेता आहे आणि गटनेता हा पदाधिकारी नसतो का? असा प्रश्न विचारत नाराजी व्यक्त केली.