आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राहक सुविधा : या जागांचे सोने करणे मनपाच्या हाती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पालकमंत्री रामदास कदम यांनी गुरुवारी धान्य, भाजीपाला फळे महोत्सव उद््घाटनप्रसंगी शहरात शंभर धान्य, फळे भाजीपाला विक्री केंद्रे सुरू करण्याची घोषणा केली. मात्र त्यांनी अशा अनेक घोषणा आजवर केल्या आणि त्याचे पुढे काय झाले हे सर्वांनाच माहीत आहे. नव्या घोषणेत मनपाला आपल्याकडील पडीक जागांचे सोने करण्याची संधी आहे. ही संधी कशी साधायची यासाठी "दिव्य मराठी'ने केलेला हा पाठपुरावा सुचवलेला मार्ग निश्चितच शहरासाठी उपयुक्त ठरणारा आहे. मात्र त्यासाठी गरज आहे मनपाच्या पुढाकाराची .....

नेमके काय होणार?
शेतकरी - ग्राहक यांचा थेट व्यवहार घडवून आणणे
दलालाची साखळी तुटून शेतकऱ्यांना थेट नफा
किफायतशीर दरात ग्राहकांना दर्जेदार फळे, धान्य मिळेल
शहरवासीयांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी मनपाच्या सहकार्याची गरज

कृषी विभागाची तयारी
जिल्ह्यातहजार शेतकरी गट आहेत.महिला बचत गट सक्षम करण्यात येत आहे. औरंगाबाद, फुलंबी, खुलताबाद, पैठण तालुक्यातील बहुतांश शेतकरी वर्षभर शहरातील ग्राहकासाठी भाजीपाला धान्य विक्रीस आणतात. या सर्वांच्या सहकार्याने १०० केंद्रांवर वर्षभर शेतमाल उपलब्ध करून देण्याचे काम कृषी विभाग पार पाडू शकतो तशी त्या विभागाची तयारी आहे.

अडथळे टाळण्यासाठी पुढाकार हवा
महापालिका पालकमंत्र्यांच्या आदेशाचे पालन करणार का, हाच पहिला अडथळा आहे. केंद्र उभारणीसाठी लागणारा खर्च कुणी पेलायचा, केंद्र चालवण्यासाठी शहरातील बेरोजगारांना देणार की खरोखर शेतकरी मुलांना रोजगार उपलब्ध करून देणार? दलाल, व्यापाऱ्यांचा यात शिरकाव होऊ शकतो. काही व्यापारी केंद्रातील दरापेक्षा स्वस्त दराने भाजीपाला, धान्य फळे विक्री सुरू करतील. राजकीय हस्तक्षेप, हे केंद्र सुरू होण्यास सर्वात मोठे अडथळे आहेत. ग्राहकांच्या प्रतिसादाशिवाय ही केंद्रे तग धरू शकणार नाहीत.

गरज कशासाठी
धान्य,फळे भाजीपाला विक्रीत उत्पादक व्यापारी, घाऊक विक्रेते, दलाल किंवा अाडते आणि सहकारी संस्थेचा समावेश असतो. यात व्यापारी ठरवतील तो भाव शेतकऱ्यांना ग्राहकांना निमूटपणे स्वीकारावा लागतो. शेतकरी अर्थात उत्पादक ते ग्राहक यांच्यामध्ये असणारी मध्यस्थांची साखळी यातील नफा मोठ्या प्रमाणात लाटते. शेतकऱ्यांना बसण्यासाठी जागा, पिण्यासाठी वापरासाठी पाणी, वीज, दळणवळणासाठीचे साधन आदी सेवा सुविधा मिळत नसल्याने कायमस्वरूपी विक्री केंद्र सुरू करण्यास अडचण येते. महापालिकेने जागा उपलब्ध करून दिल्यास ही समस्या दूर होऊन ताजा भाजीपाला दर्जेदार धान्य ग्राहकांना किफायतशीर किमतीत उपलब्ध होईल.

१० केंद्रे महिनाभरात सुरू करणे शक्य
पालकमंत्रीकदम यांनी मे रोजी मनपाच्या सहकार्याने शहरात शंभर ठिकाणी भाजीपाला विक्री केंद्रे सुरू करण्याची ग्वाही दिली. त्याची अंमलबजावणी होऊ शकते का, याबाबत "दिव्य मराठी'ने चाचपणी केली असता, महापालिका प्रशासनाने ठरवले तर शहरातील मुख्य दहा ठिकाणी तातडीने ही केंद्रे सुरू करणे शक्य आहे.

मनपाने हे करावे
पालकमंत्र्यांच्या घोषणेची पूर्तता करण्यासाठी मनपाने पहिल्या टप्प्यात महत्त्वाच्या दहा ठिकाणी केंद्रे उभारावीत. तेथे पिण्याचे पाणी, वीज, सुरक्षा, टेबल, खुर्च्या, ग्राहकांना ये-जा करण्यासाठी रस्ते विकास या मूलभूत सोयी उपलब्ध करून द्याव्यात. त्यानंतर उर्वरित १० ठिकाणी केंद्रे सुरू करण्याचे नियोजन करावे.

आतापर्यंतचे प्रयत्न
मध्यस्थांचे उच्चाटन करण्यासाठी कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्पांतर्गत शेतकरी गट, कंपन्या, बचत गट स्थापन करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. या गटांच्या माध्यमातून शहारातील कासलीवाल मार्व्हल, आदित्य कॉलनी, गारखेडा परिसरातील तालुका कृषी कार्यालय अशा काहीच भागात आठवड्यातून दोन दिवस अशी बाजारपेठ भरते.

"दिव्य मराठी'ने केंद्रांसाठी सुचवलेल्या १० जागा
१. रेल्वेस्टेशनवरील बीओटीवरील संकुल
२. रिलायन्स माॅलमधील मनपाचे गाळे
३. टिळक नगरातील मनपाचा भूखंड
४. वसंत भुवनचा बीओटी प्रकल्प
५. शहागंज भाजी मंडई
६. हडको एन-९ मधील व्यापारी संकुल
७. श्रीहरी पॅव्हेलियनमधील मनपाचे गाळे
८. त्रिमूर्ती चौक मनपा व्यापारी संकुल
९. बजरंग चौकातील मनपाचे संकुल
१०. मुकुंदवाडीतील व्यापारी संकुल
बातम्या आणखी आहेत...