आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation Election Issue At Aurangabad

भाजपची मुस्लिम भागात तयारी, सर्व समाजाचा पाठिंबा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महापालिकेच्यानिवडणुकीसाठी भाजपने मुस्लिमबहुल भागात सदस्य नोंदणीच्या माध्यमातून पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन महिन्यांत भाजपचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष मोहंमद हुसेन यांनी सातत्याने बैठका घेत नोंदणीमध्ये पुढाकार घेतला आहे. शहरात मुस्लिम समाजाची साडेसहा हजार नोंदणी झाली असून तीस हजार नोंदणीचे उद्दिष्ट असल्याची माहिती हुसेन यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

शहरात मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजप, शिवसेनेचा एकही नगरसेवक नाही. त्यामुळे या भागात नेहमी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष नगरसेवक निवडून येतात. भाजपला मुस्लिमबहुल भागात मतदान होत नाही. त्यामुळे या भागात सदस्य नोंदणीवर जोर देण्यात येत आहे. शहरात जवळपास २३ वाॅर्डांत मुस्लिमबहुल भाग आहेत. त्यामध्ये रोशनगेट, चेलीपुरा, शहाबाजार, बुढीलेन, रहेमानिया कॉलनी, बेगमपुरा, भडकलगेट, किराडपुरा, गणेश कॉलनी, सिटी चौक, बायजीपुरा, सिल्कमिल कॉलनींसह अन्य भागांचा समावेश आहे.

^भाजपला सर्व समाजाचा पाठिंबा सदस्य नोंदणीत मिळत आहे. शहरात दीड लाख सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्या दृष्टीने भाजपने सर्व भागांत तयारी केली आहे. सध्या तीस हजारपेक्षा जास्त सदस्य नोंदणी शहरात झाली आहे. मनपाच्या दृष्टीने सर्व भागांत भाजपने जोर दिला असून त्याला प्रतिसाददेखील चांगला मिळत आहे. -शिरीष बोराळकर, प्रवक्ते,भाजप

वारे मनपा निवडणुकीचे
मुस्लिम समाजावर प्रभाव असणाऱ्या लोकांनाही सहभागी करून घेतले जात असल्याचे अल्पसंख्याक मोर्चाचे सचिव वाजेद अस्लम यांनी सांिगतले, या सदस्य नोंदणीच्या माध्यमातून पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात लोक भाजपकडे आकर्षित होत आहेत. या नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मार्चअखेर ३० हजार नोंदणी करण्याचे लक्ष असल्याचे अस्लम यांनी सांिगतले.