आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनपा निवडणुकीसोबतच सातारा न.प.ची निवडणूक ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - झपाट्याने विकसित होत असलेल्या सातारा आणि त्याला लागूनच असलेल्या देवळाई या दोन गावांसाठी स्वतंत्र नगर परिषद होणार आहे. त्यासाठी मागवण्यात आलेल्या हरकती, आक्षेपांमध्ये 12 जणांनी 19 तक्रारी केल्या. त्यावर शुक्रवारी (27 जून) जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांच्याकडे सुनावणी झाली. तक्रारकर्त्यांनी दिलेल्या पुराव्यांवर या वेळी चर्चा झाली असून येत्या 8 दिवसांत याबाबतचा अहवाल शासनाकडे पाठवला जाईल
आणि त्यावर अंतिम निर्णय होईल, असे जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले. पालिकेच्या निवडणुकीसोबतच सातारा नगर परिषदेची निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधान परिषदेच्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक आचारसंहितेमुळे या सुनावणीस विलंब झाला होता. 17 आक्षेप नागरिकांनी दाखल केले होते. त्यात या नगर परिषदेची हद्द मोठी असावी, नगर परिषदेची गरज काय, औरंगाबाद महानगरपालिकेत समावेश झाल्यास फायदा होईल, सीमा निश्चित करताना नाले तसेच गायरानाची हद्द हाच निकष ठरवावा, अशा सूचना आणि हरकती होत्या. त्यावर सुनावणी झाली असता लेखी पुराव्यांची मागणी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली. पुरावे सक्षम असेल तरच आक्षेपाचा विचार होऊ शकतो, असे पूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते. तरीही समोर आलेल्या पुराव्यांनुसार शासनाकडे अहवाल सादर करण्यात येणार असून त्यानंतर नगर परिषदेच्या गठनाची अंतिम अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे. पुढील वर्षाच्या एप्रिलमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीबरोबर सातारा नगर परिषदेची निवडणूक होण्याची शक्यता आहे.