आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation Elections Reservation News In Marathi

अनेकांचा भाजप प्रवेश लांबणीवर, सातारा-देवळाई मनपात गेल्याने घेतला निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- महानगरपालिका निवडणुकीचे आरक्षण स्पष्ट होताच वाॅर्ड हातातून गेल्याने प्रस्थापित नगरसेवकांचे धाबे दणाणले. राजकारणात सक्रिय राहण्यासाठी तसेच पुन्हा निवडून येण्यासाठी कोणता वॉर्ड सोयीचा राहील हे समीकरण जुळवून पक्षांतराचा बेत रचला. काहींनी स्पर्धक नको म्हणून आरक्षण होताच पक्षांतर केले; पण सातारा-देवळाई महापालिकेत समाविष्ट होताच पुन्हा आरक्षण बदलण्याच्या शक्यतेने काही जणांनी भाजप प्रवेश तूर्तास लांबणीवर टाकला आहे.
काँग्रेसची ‘नाळ’ पूर्ववत जोडली जावी म्हणून आपण काही उपाय सुचवले होते. काँग्रेस खासदार, आमदार, नगरसेवक नागरिकांशी ‘कनेक्ट’ राहावा म्हणून ‘हेल्पलाइन’ सुरू केली होती. मात्र, काँग्रेस नेत्यांनी जनतेच्या प्रश्नांना बगल देण्याचे धोरण अवलंबल्यामुळेच पक्षांतर केले, असे मत नगरसेवक प्रमोद राठोड यांनी व्यक्त केले. याशिवाय गायकवाड, कावडे, शिंदे यांनीही पक्षामध्ये घुसमट झाल्याने पक्षांतर केल्याचे स्पष्ट केले. काँग्रेसचे नगरसेवक प्रमोद राठोड, सत्यभामा शिंदे, रावसाहेब गायकवाड, रवी कावडेंसह काही कार्यकर्त्यांनीही गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसची पडझड आणि भाजपला मिळत असलेल्या यशामुळे नगरसेवकांनी पक्षांतर केले आहे. राठोड यांनी काँग्रेसला या ‘बॅड पॅच’मधून बाहेर काढण्यासाठी अॅक्शन प्लॅन दिला होता. एन-३, एन-४ वॉर्डामधील नागरिकांसाठी राठोड यांनी हेल्पलाइन सुरू केली आहे त्याप्रमाणे काँग्रेस नेत्यांनी हेल्पलाइन सुरू केल्यास काँग्रेसचा ‘पब्लिक कनेक्ट’ वाढेल आणि बॅड पॅचही दूर होईल, असा राठोड यांचा प्रस्ताव होता. नंदनवन काॅलनी, शांतीपुऱ्याच्या एका नगरसेवकाचा प्रवेश निश्चित झाला होता. त्यांनीही दलित, हिंदू मतांचे गणित केले होते; पण सातारा-देवळाईच्या समावेशाची बातमी कळताच त्यांनी तूर्तास निर्णय मागे घेतला. असेच समीकरण समोर ठेवून रिपब्लिकन नेते जालिंदर शेंडगे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. एन-७ चे नगरसेवक दोनदा भाजपत गेले होते. आता तिसऱ्यांदा त्यांची तयारी होती; पण भाजपच्या एका गटाचा विरोध असल्याने त्यांचे पक्षांतर थांबले.
भेटीमुळे व्यथित-
राठोडयांनी पाच वर्षांमध्ये १४,७९० हेल्पलाइनवरील कॉलपैकी १०, २४५ प्रश्नांचा निपटारा केला. खासदार राजीव सातव यांनी हा प्रयोग नेत्यांपुढे मांडण्याचे सुचवले. त्यानुसार महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांना भेटून राठोड यांनी हायटेक हेल्पलाइनचे सादरीकरण केले होते. मात्र, प्रकाश यांनी त्यांच्या प्रस्तावाला सकारात्मक उत्तर दिले नाही. शिवाय त्यांनी जात विचारल्यामुळे खूपच व्यथित झालो, असे राठोड यांनी आवर्जून सांगितले.