आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation Friday Meeting Postponed Aurangabad

मनपाची शुक्रवारी होणारी सर्वसाधारण सभा पुढे ढकलली

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - महापालिकेच्या दोन प्रभागांतील निवडणूक आचारसंहितेमुळे उद्या शुक्रवारी (20 जानेवारी) होणारी सर्वसाधारण सभा पुढे ढकलण्यात आली आहे. आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी यासंदर्भात पत्र दिल्यानंतर महापौर अनिता घोडेले यांनी हा निर्णय घेतला.
या सभेत आयुक्त विरुद्ध पदाधिकारी असे चित्र रंगण्याची शक्यता होती. आरोप-प्रत्यारोपांचे द्वंद्व कोणत्या दिशेने जाते, याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, आयुक्तांनी महापौरांना तिळगूळ देत वाद संपल्याचे जाहीर केले. आता शुक्रवारची सभा होणार नसल्यामुळे आयुक्तांच्या तिळगुळाचा गोडवा किमान महिनाभर तरी कायम राहण्याची शक्यता आहे.
गेल्या आठवड्यात आचारसंहिता सुरू असताना सर्वसाधारण सभा झाली होती. मात्र त्या सभेतील विषयांचा निवडणूक होत असलेल्या दोन्ही प्रभागांशी काहीही संबंध नव्हता. आगामी सभेत संपूर्ण शहराचा खर्च आणि महसूल यावर चर्चा होणार असल्याने आचारसंहिता भंगाचा ठपका बसू शकतो. त्यामुळे डॉ. भापकर यांनी तसे पत्र महापौरांना दिले. आचारसंहिता संपल्यानंतर ही सभा घेण्यात येईल, असे महापौर घोडेले यांनी पत्रकारांना सांगितले.