आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाकडील ६.६५ कोटी सातारा न.प.च्या ताब्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सातारा-देवळाईनगर परिषद बरखास्तीची अधिसूचना निघाल्यानंतर नगर परिषदेचा कोट्यवधी रुपयांचा निधी महानगरपालिकेकडे हस्तांतरित झाला होता; परंतु जानेवारी रोजी पुन्हा जिल्हा प्रशासनाकडे परिसराचा कारभार गेल्याने हा निधी प्रशासनाने परत मागितला आहे. महापालिकेने नगर परिषदेचा ताबा घेताना कोटी ४८ लाख रुपये आपल्या खात्यात वळते केले होते. शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला त्यापैकी कोटी ३५ लाख रुपये परत मिळाले असून चार महिन्यांत पालिकेतर्फे सुमारे ८० लाख रुपये खर्च केले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सातारा-देवळाई नगर परिषदेला विविध योजनांतर्गत निधी प्राप्त झाला होता. मुख्याधिकारी अशोक कायंदे यांनी अनेक विकासकामांसाठी प्रस्ताव तयार करून निधीसाठी प्रयत्न केले होते. अतिरिक्त बांधकामावर कारवाईदरम्यान बांधकाम व्यावसायिकांकडून अागाऊ रक्कम घेण्यात आली होती. त्यातूनही जवळपास कोटी, ६९ लाख रुपयांची निधी जमा झाला होता. २१ मे रोजी तयार करण्यात आलेल्या अंदाजपत्रकानुसार नगर परिषदेच्या एकूण सहा बँकांमधील खात्यांमध्ये कोटी ४८ लाख ६८ हजार ६०३ रुपये जमा होते. महानगरपालिकेने हा निधीही ताब्यात घेतला होता.

निधीसाठी पत्रव्यवहार
जिल्हाधिकारी तसेच मुख्याधिकाऱ्यांनी महानगरपालिकेशी पत्रव्यवहार केला होता. निधी हस्तांतरण प्रक्रियेदरम्यान पूर्वी असलेले बँक खाते केवळ ताब्यात घेणे आवश्यक होते. त्यातून त्यांनी खर्च केलेली रक्कम वगळता खात्यात असलेली रक्कम जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात घेतली जात असून शुक्रवारी या खात्यांमधील कोटी ६५ लाख रुपये नगर परिषदेला प्राप्त झाले आहेत. कोटी ४८ लाख ६०३ रुपयांपैकी कोटी ६५ लाख रुपयांची रक्कम प्राप्त झाल्याने उर्वरित रक्कम पालिकेतर्फे खर्च करण्यात आली असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होते. १५ जानेवारीपर्यंत पालिकेतर्फे करण्यात आलेल्या खर्चाचा तपशील देण्याचे आदेश जिल्हाधिकारी पांडे यांनी दिले आहेत. त्यामुळे उर्वरित रक्कम नेमकी कुठे कशी खर्च करण्यात आली, याचा अहवाल लवकरच सादर करण्यात येणार आहे.