आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौर-आयुक्त वादावर तिळगुळाचा उतारा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - गेल्या काही दिवसांपासून महापौर अनिता घोडेले आणि आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्यातील वाक्युद्ध आज तिळगुळाच्या गोडव्याने संपुष्टात आले. झाले गेले सर्व विसरून नव्या जोमाने आम्ही कामाला लागलो असल्याचे दोघांनीही जाहीर केले.
सकाळी डॉ. भापकर यांनी महापौरांचे दालन गाठून तिळगूळ पुढे केले आणि त्यास महापौरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर दोघांमध्ये पाऊण तास गप्पा रंगल्या. तेथून बाहेर पडल्यानंतर आमच्यात कोणताही वाद नसल्याचे दोघांनीही प्रसिद्धीमाध्यमांना सांगितले. यापुढे शहराच्या विकासासाठी फक्त सुसंवाद होईल, असे दोघांनीही स्पष्ट केले.
काँग्रेसच्या काही सदस्यांनी आयुक्तांवर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवत अविश्वास ठराव आणण्याची मागणी केली होती. अकार्यक्षम म्हटल्याने डॉ. भापकर संतप्त झाले आणि त्यांनी पदाधिका-यांवर भन्नाट आरोप केले. त्याला प्रत्युत्तर देण्याची भाषा महापौरांनी केली होती. त्यामुळे हा वाद चांगलाच पेटणार, असे वाटत होते. अन्य पक्षांसह शिवसेनेनेही यातून माघार घेतली होती. त्यामुळे महापौर एकाकी पडल्याचे चित्र होते. तरीही काहीही झाले तरी भापकरांना उत्तर दिले जाईल, असे त्यांनी जाहीर केले होते.
मी पतंग उडवत होते.. - रविवारी संक्रांतीच्या दिवशी कोणाकोणाला वाण दिले, असे पत्रकारांनी महापौरांना विचारले असता दिवसभराच्या भरगच्च् कार्यक्रमांमुळे त्यासाठी वेळच मिळाला नाही, असे सांगतानाच दुपारी मी तर पतंग उडवत होते, असे मिश्कील उत्तर त्यांनी दिले. काल शहरातील वेगवेगळ्या पतंग महोत्सवाच्या उद््घाटनाला त्या गेल्या होत्या. बराचसा वेळ त्यांचा यामध्येच गेला.
* दररोज चिखलफेक करण्यात अर्थ नाही. कोणाशी वाद घालण्याचा माझा इरादा नव्हता. महापौरांसोबत माझा वैयक्तिक वाद नव्हता. तिळगुळाच्या निमित्ताने सुसंवाद झाला. त्याचे चांगले परिणाम दिसून येतील. - पुरुषोत्तम भापकर, आयुक्त