आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation Medical Department Aurangabad

50 खाटांची 5 रुग्णालये मंजूर;10 आयसीयू अँम्ब्युलन्स मिळणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - महानगरपालिकेची आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी सरकारने मनपाला 50 खाटांची पाच रुग्णालये उभारण्यास मंजुरी दिली आहे. त्याशिवाय रुग्णांना तातडीने उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी 10 आयसीयू अँम्ब्युलन्स मनपाला देणार आहे.

महानगरपालिकेची सध्या 20 रुग्णालये असून त्या माध्यमातून शहरात आरोग्य सेवा पुरवली जाते. त्यात आता आणखी 5 रुग्णालयांची भर पडणार आहे. उपमहापौर संजय जोशी यांनी सांगितले की, राज्य सरकारने या कामांना मंजुरी दिली असून ही रुग्णालये शहराच्या विविध भागांत उभारली जातील. त्यासाठी राज्य सरकार निधी देणार आहे. याशिवाय मनपाच्या ताफ्यात लवकरच 10 आयसीयू अँम्ब्युलन्स दाखल होणार असून सरकारकडून ही सुविधा मनपाला दिली जाणार आहे. या अँम्ब्युलन्समुळे तातडीने उपचारांची गरज असलेल्या रुग्णांना मोठा आधार मिळणार आहे.

शुक्रवारी मनपाच्या आरोग्य समितीच्या बैठकीत औषध फवारणीच्या विषयावरून सभापती व इतरांनी आरोग्य विभागाला चांगलेच धारेवर धरले. शहरात धूर फवारणी होत नसल्याची तक्रार त्यांनी केली. उपमहापौर संजय जोशी यांनी धूर फवारणी व औषध फवारणीचे वेळापत्रक बनवून सर्व नगरसेवकांना त्यानुसार पूर्वकल्पना दिली पाहिजे अशी सूचना मांडली. त्यावर सर्व वॉर्डांत नियमित फवारणीचे आदेश देण्यात आले. मनपाच्या 20 रुग्णालयांपैकी फक्त सहा रुग्णालयांमध्ये फक्त सकाळी ओपीडी सुरू असते. या वेळी आरोग्य सभापती मनीष दहिहंडे, उपमहापौर संजय जोशी, विरोधी पक्षनेते डॉ. जफर खान, किशोर नागरे, विजय वाघमारे, डॉ. नुझरत तरन्नुम, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जयर्शी कुलकर्णी, आरोग्य अधिकारी डॉ. संध्या टाकळीकर, नगरसचिव प्रमोद खोब्रागडे यांची उपस्थिती होती.