आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation Meeting Clashes Aurangabad

सभेवर दहा मिनिटांत 60 हजारांचा चुराडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - ‘आयुक्त सर्वसाधारण सभांना येत नाहीत. ड्रेनेज, रस्ते आणि विकासकामे ठप्प आहेत. आम्ही कुणाला आमच्या तक्रारी सांगायच्या,’ असे सवाल करीत नगरसेवकांनी आज सर्वसाधारण सभेत गोंधळ केला. त्यानंतर आजची सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली. ती 26 तारखेला घेण्याचे महापौरांनी जाहीर केले. अवघ्या दहा मिनिटांत 60 हजार रुपयांचा खर्च करून नगरसेवक परत फिरले.

17 सप्टेंबरची सुटी आणि कालचे गणेश विसर्जन यामुळे आज ठरलेली सर्वसाधारण सभा फार काळ चालणार नाही असा अंदाज होताच. त्यातच आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे मुंबईला गेल्याने नगरसेवकांना आयतेच कारण मिळाले. सकाळी साडेअकरा वाजता सुरू होणारी सर्वसाधारण सभा साडेबारा वाजेच्या सुमारास सुरू झाली. महापौर कला ओझा, उपमहापौर संजय जोशी त्यांच्या आसनावर होते, तर सभागृहात सत्ताधारी व विरोधकांचे 36 नगरसेवक होते. वंदे मातरम्ने कामकाज सुरू झाले आणि त्यानंतर एक र्शद्धांजलीचा प्रस्ताव आला. मात्र, त्यानंतर गोंधळच झाला.

अफसर खान यांनी सभागृहात आयुक्त नाहीत, आम्ही आमच्या प्रश्नांबाबत बोलून काही फायदा नाही, असे सांगत मागील सभांचे इतिवृत्त मंजूर करीत सभा तहकूब करण्याची सूचना केली. त्यानंतर गिरजाराम हाळनोर यांनी आयुक्तांसह सर्व अधिकार्‍यांना उपस्थित राहण्याच्या सूचना द्या, अशी मागणी केली. सभा तहकूब होण्याच्या बेतात असताना महेश माळवतकर यांनी त्यांच्या वॉर्डातील ड्रेनेजची कामे होत नाहीत, रस्त्यांची कामे ठप्प आहेत, असे सांगत नगरसेवक म्हणून आम्ही काम कसे करायचे? असे विचारले. त्र्यंबक तुपे यांनी गुंठेवारी भागांतील कामे, रस्ते, ड्रेनेज यांची कामे होत नसल्याचे सांगत महापौरांच्या आसनाकडे धाव घेतली. कामे होत नाहीत असाच गजर करीत नासेर कुरेशी, अफसर खान, महेश माळवतकर, विरोधी पक्षनेते डॉ. जफर खान, बालाजी मुंडे, संजय चौधरी, सुशील खेडकर तिकडे गेले. याच गदारोळात गजानन बारवाल यांनी 14 ऑगस्टच्या इतिवृत्तात केलेल्या सूचनेसंदर्भात एक दुरुस्ती सूचना मांडली व ती मंजूर झाली.