आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राकांसाठी पुन्हा लोटांगण, राकाज लाइफस्टाइल क्लब प्रकरणावरून मनपाच्या सर्वसाधारण सभेत प्रचंड गदा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महानगरपालिकेची सोमवारी झालेली सभा "राकाज लाइफस्टाइल क्लब' या एकमेव विषयावर गाजली. या क्लबने नियमांचे उल्लंघन करीत केलेल्या अनधिकृत गोष्टींची यादी वाचून दाखवल्यावरही आणि नंतर बीओटी कक्षप्रमुख सिकंदर अली यांना महिलांनी बांगड्यांचा आहेर करूनही राकांचा करार रद्द करा ही मागणी प्रशासनाने मान्य केली नाही. अखेर आणखी तीन दिवसांचा वेळ देत राकांबाबत कोणताही निर्णय होता सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली. एवढा गदारोळ होऊनही राकांपुढे मनपा प्रशासनाने लोटांगण घातल्याचेच पाहायला मिळाले.

एक महिन्यापासून गाजत असलेल्या राका लाइफस्टाइल प्रकरणात मनपा प्रशासनाच्या बोटचेपेपणाने काहीच कारवाई होत नसल्याने आज सर्वसाधारण सभेत हा विषय उपस्थित करण्यात आला. या विषयावरून सभागृहात एवढा गदारोळ झाला की कामकाज मध्येच तहकूबही करावे लागले. शिवसेना, भाजप, एमआयएमसह सगळ्याच पक्षांच्या नगरसेवकांनी, खासकरून महिलांनी या विषयावर संताप व्यक्त केला.

थातूरमातूरपंचनामा का केला?
राजवानखेडे यांनी राकाजमध्ये एवढे काही घडत असताना, पोलिस कारवाई होईपर्यंत मनपा प्रशासन झोपले होते काय, असा प्रश्न केला. शिवसेनेच्या शिल्पाराणी वाडकर यांनी तर एकापाठोपाठ एक सवाल करीत प्रशासनाची बोलतीच बंद केली.

तुम्ही दबाव आणताय : राठोड
आतीलचर्चेने समाधान झालेल्या राठोड यांनी अली यांना सभा सुरू झाल्यावर पुन्हा धारेवर धरले. प्रशासनाची राकांवर गुन्हा दाखल करायची इच्छा नाही. उलट आमच्यावर तुम्ही दबाव आणत आहात. प्रभावशाली व्यक्तींना फोन करून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करीत आहात, असा थेट आरोप अली यांच्यावर केला. सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांनी करार रद्द करून गुन्हे नोंदवा अशी मागणी केली. वैद्य यांनी कारवाई होत नाही तोपर्यंत सभागृह तहकूब करा, अशी मागणी केली. यानंतर महापौरांनी तशी घोषणा केली.

सिकंदर अलींची वकिली
अलीयांनी राकांनी कराराचे उल्लंघन केले असले तरी त्यांचा करार रद्द करता येणार नाही असे सांगताना तेथे बेकायदा गोष्टी घडत असल्याचे सिद्ध करावे लागेल असे म्हटले. यावर वैद्य यांनी सभागृहाची भावना राकांचा करार रद्द करावा अशी असताना तुन्ही त्यांची वकिली का करता असा सवाल केला. तर प्रमोद राठोड, घडामोडे यांनी सिद्ध करण्यासाऱखे पुरावे तुमच्यामुळेच हातचे गेले असा आरोप केला. नंतर सदस्यांनी राकाला हाकला, करार रद्द झालाच पाहिजे अशा घोषण दिल्याने गोंधळ वाढला. त्यामुळे महापौरांनी दहा मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले.

सिकंदर अलींची कबुली
उपमहापौरप्रमोद राठोड यांनी सिकंदर अली यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करीत तेथे काय काय अधिकृत आहे याची माहिती विचारली. त्यावर सिकंदर अली यांनी पार्किंगच्या जागेत बांधकाम, हुक्का पार्लर, डान्स क्लास, म्युझिक क्लास हे सारे अनधिकृत आहेत याची कबुली दिली.

अलींच्या कबुलीवर महिला सदस्य भडकल्या. शिवसेनेच्या सुनीता आऊलवार यांनी सिकंदर अली यांना बांगड्यांचा आहेर दिला. या वेळी शिल्पाराणी वाडकर, मीना गायके, कीर्ती शिंदे, अॅड. माधुरी अदवंत यांच्यासह सर्व महिलांनी अलींना घेराव घालून राकाचा करार रद्द करा, अशा घोषणा दिल्या.
बातम्या आणखी आहेत...