आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation Meeting On Friday Aurangabad

शुक्रवारच्या सभेत लागणार आयुक्तांचा कस

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मागील तीन आर्थिक वर्षात महापालिकेने मालमत्ता आणि पाणीपट्टी वसुलीचे काय केले, यावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी (20 जानेवारी) विशेष सभा बोलवण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांतील उद्दिष्टे आणि त्या तुलनेत जमा झालेल्या महसुलाचे आकडे लक्षात घेता सभागृहाला सामोरे जाताना आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांचा कस लागणार आहे.
अंदाजपत्रक सादर करताना मूळ अंदाजपत्रकात दिलेली उद्दिष्टे सुधारित अंदाजपत्रकात कमी करण्यात आल्यानंतरही पूर्ण झालेले नाही. मालमत्ता वसुलीचे प्रमाण गेल्या तीन वर्षांत अनुक्रमे 65, 83 आणि 32 टक्के, तर पाणीपट्टी वसुलीचे प्रमाण 40, 12 आणि 37 टक्के इतके आहे. त्यावर आयुक्त काय खुलासा करणार याकडे पालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
पाणीपट्टी आणि मालमत्ता वसुलीबाबत नेमके काय चालले आहे, हे जाणून घेण्यासाठी सदस्यांच्या मागणीवरून ही सभा बोलवण्यात आली आहे. काय झाले ते सभागृहासमोर आयुक्त ठेवतील. त्यावर चर्चा होईल. असे महापौर घोडेले यांनी सांगितले. या बैठकीत आयुक्तांना टारगेट करण्याचा आमचा प्रयत्न नसल्याचे त्या म्हणाल्या.