आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation Mission Collect 100 Crores Tax

मनपाचे मिशन १०० कोटी ! मालमत्ता करवसुली वाढवण्यासाठी धडक मोहिमांना वेग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - तुटपुंज्या करवसुलीमुळे विकासकामांत अडथळा येत असून तो दूर करण्यासाठी आता मनपाने कंबर कसली आहे. मार्चअखेरपर्यंत १०० कोटींचा टप्पा गाठण्यासाठी रणनीती आखली आहे. त्यासाठी अतिरिक्त उपायुक्तांनीही वाॅर्ड दत्तक घेतले असून लवकरच नगरसेवकांनाही त्यात सहभागी करून घेतले जाणार आहे. ज्या वाॅर्डांत जास्त वसुली तिथे कामांना प्राधान्य, असा अलिखित संदेश नगरसेवकांपर्यंत पोहोचवण्यात आला असून त्यांच्या सहकार्याने आतापर्यंत झालेली अथवा थकलेली वसुली हाती येण्याची प्रशासनाला आशा आहे.
महापालिकेच्या कारभारावर सातत्याने ओरड होत असली तरी सगळ्या बाबींचे घोडे पैशावरच येऊन अडत असल्याने करवसुली वाढवण्याशिवाय पर्याय नसल्याचे वारंवार समोर येत आहे. त्यात अपुरा कर्मचारी वर्ग, राजकीय दबाव, नागरिकांची अनास्था अशा साऱ्या बाबींच्या जोरावर मनपाची करवसुली कायम कमी होत राहिली. सुनील केंद्रेकर यांनी आयुक्तपदाची सूत्रे सांभाळल्यानंतर त्यांनी वसुलीकडे लक्ष दिले अाहे. उपायुक्त अय्युब खान यांना जास्तीत जास्त वसुली करण्याचे आदेश दिले आहेत.

मुख्यभर 'अ' 'क' वर : मनपाच्यासहाही प्रभागांतील या दोन प्रभागांची वसुली कमी आहे. त्यामुळे या भागावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या वाॅर्डांची वसुली चांगली असते. मध्ये जुन्या शहराचा बराचसा भाग येतो. या भागांत वसुली वाढवण्यासाठी प्रशासनाने नगरसेवकांचीही मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. वाॅर्डांत कामे करा, अशी मागणी करण्यासाठी आयुक्तांकडे धाव घेणाऱ्या या नगरसेवकांना तुम्ही आम्हाला करवसुलीत मदत करा, तुमच्या कामांना प्राधान्य देऊ, असे सांगितले जात आहे. वर्षभरापासून विकासकामे होत नसल्याने नाराज नगरसेवकांना आता विकासकामे करून घेणे आवश्यक आहे, नसता नागरिकांचा रोष सहन करावा लागणार आहे. त्यामुळे अनेकांनी प्रशासनाला मदत करण्याची तयारीही दर्शवली अाहे.

काय करत आहे मनपा ?
महापालिकेकडेआपणहून नियमितपणे कर भरणाऱ्या नागरिकांशिवाय इतरांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. ज्यांनी अनेक वर्षे करच भरलेला नाही किंवा ज्यांच्याकडे मनपानेही कधीच कराची मागणी केलेली नाही तसेच ज्यांनी कर बुडवला अथवा थकवला आहे, त्यांच्यावर अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे. बड्या थकबाकीदारांची यादी करून त्यांना कर भरण्यास भाग पाडण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येत आहे.

सगळे अधिकारी कामाला
आर्थिकवर्ष संपायला आता सव्वादोन महिने बाकी आहेत. आतापर्यंत ५६ कोटींची करवसुली झाली आहे. ती किमान १०० कोटींपर्यंत नेण्यासाठी वॉर्ड अधिकारी कामाला लागले आहेत. अतिरिक्त आयुक्त, उपायुक्तांनाही वॉर्ड दत्तक देण्यात आले आहेत.