आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालमत्ता करासाठी मनपा तयार करतेय अ‍ॅप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दिवसेंदिवस स्मार्ट फोनचा वापर वाढत असल्याने मालमत्ता करासंदर्भातील कामे सुलभ व्हावीत यासाठी मनपा लवकरच अँड्राॅइड अ‍ॅप तयार करणार आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या करासंबंधी माहिती मिळेल आॅनलाइन कर भरणाही करता येणार आहे.

महापौर त्र्यंबक तुपे यांनी शुक्रवारी मालमत्ता कर व्यावसायिक कराच्या वसुलीसंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. त्यात मनपाची वसुली, थकबाकीचे वाढते प्रमाण, करयोग्य मालमत्तांची नोंद करण्यात होत असलेली मंद गती नवीन मालमत्ता शोधण्यात होत असलेली दिरंगाई या अनुषंगाने चर्चा झाली. त्यानंतर या कामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना महापौर तुपे उपमहापौर प्रमोद राठोड यांनी दिल्या.

हेल्पलाइन आठवडाभरात : नागरिकांनाआपल्या मालमत्तेवर कर आकारणी, डिमांड नोटच्या उपलब्धतेसाठी मनपाच्या कार्यालयांत चकरा माराव्या लागू नयेत यासाठी हेल्पलाइन सुरू करण्यात येणार आहे. या हेल्पलाइनच्या माध्यमातून नागरिक एका फोनवर मालमत्तेच्या अ‍ॅसेसमेंटबाबत डिमांड नोटबाबत मागणी नोंदवू शकतील नागरिकांना ते घरपोच पोहाेचवले जाईल. ही हेल्पलाइन सेवा पुढील आठवड्यात सुरू होणार आहे.

अ‍ॅप तयार करणार : नागरिकांनाकर जाणून घेणे भरणा करणे या कामांत मनपाच्या कारभाराचा फटका नागरिकांनाच बसतो. यावर तोडगा म्हणून स्मार्टफोनचा वापर करण्यात येणार आहे. महापौर तुपे म्हणाले की, आपला कर किती आहे हे समजावे आॅनलाइन भरणा करता यावा यासाठी हे खास अ‍ॅप तयार केले जाणार आहे. मनपाच्या बँक खात्याशी हे अ‍ॅप संलग्न असणार आहे शिवाय सर्व झोन कार्यालयांतर्गत येणाऱ्या मालमत्तांचा तपशील त्याद्वारे उपलब्ध होईल.

इतर सूचना
- नवीनवसाहतींचे सर्वेक्षण करून १०० टक्के मालमत्तांना कर आकारणी करण्यासाठी विशेष मोहीम राबवा
- मालमत्ता करात बांधकाम भागांचे महत्त्वाप्रमाणे वर्गीकरण करून कर आकारणी केल्यास नागरिकांना रास्त दरात कर आकारला जाईल भरणाही वाढेल.
- एका महिन्यात व्यावसायिक मालमत्तांची डिमांड नोटीस दोन महिन्यांत निवासी मालमत्तांची डिमांड नोटीस नागरिकांना देण्यात यावी तीन महिन्यांत १०० टक्के मालमत्तांना कर आकारणीबाबत कृतिआराखडा तयार करा.
बातम्या आणखी आहेत...