आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अायुक्तांशी चर्चेनंतर उद्यान अधीक्षकांनी राजीनामा घेतला मागे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ‘तुम्ही फुकटचा पगार घेता, हा विभाग कामाचा नाही, नेहमी झोपलेला असतो,’ असे महापालिकेचे प्रभारी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी वेळोवेळी सुनावल्याने आपण पदाचा राजीनामा देत आहोत, असे नमूद करून महानगरपालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक डॉ. विजय पाटील यांनी शुक्रवारी आयुक्तांकडे राजीनामा सुपूर्द केला. रात्री उशिरा केंद्रेकरांशी झालेल्या बाेलण्यानंतर त्यांनी राजीनाम्याचा निर्णय स्थगित केल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, डॉ. पाटील यांच्या राजीनाम्यानंतर पदाधिकाऱ्यांनीही केंद्रेकर भर सभागृहात पदाधिकाऱ्यांशी ‘अरे-तुरे’ची भाषा करत असल्याची तक्रार केली.

९ जून २०११ या दिवशी उद्यान अधीक्षक म्हणून रुजू झालेल्या पाटील यांच्याकडे कर्मचारीवर्ग अपुरा आहे. त्यांच्याकडे अधिकारही नाहीत. केंद्रेकर यांच्याकडून आलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांना अन्य अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागत होती. ‘मी स्वाभिमानी शेतकऱ्याचा मुलगा आहे, कधीही फुकटचा पगार घेतला नाही,’ असे डॉ. पाटील यांनी स्वत:च्या हस्ताक्षरात लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. महापौर त्र्यंबक तुपे म्हणाले, ‘राजीनाम्याची प्रत मिळाली आहे, अधिकाऱ्यांना सन्मानाची वागणूक मिळावी. डॉ. पाटील यांच्या विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. त्यांचेही म्हणणे ऐकून घ्यायला हवे होते. डॉ. पाटील यांचा राजीनामा मंजूर करण्यात येऊ नये, असे आम्ही सांगू. पदाधिकाऱ्यांशी आयुक्त सौजन्याने बोलत नाहीत, अशाही तक्रारी आल्या आहेत. आयुक्त वयाने मोठे असले तरी त्यांनी लोकप्रतिनिधींचा सन्मान ठेवायला हवा.’
बातम्या आणखी आहेत...