आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपात दबाव गट तयार करण्यात अपयश; काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष औताडे यांची कबुली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - औरंगाबाद शहरालगत हरितपट्टय़ातील हजारो एकर जमिनीवर अनधिकृत बांधकामे झाली असून तेवढीच सुरूही आहेत. शेतकर्‍यांना त्यांचा ऊस मुख्य रस्त्यावर आणण्यासाठीही रस्ता शिल्लक राहिला नाही, असा आरोप करतानाच पालिकेत दबाव गट निर्माण करण्यात काँग्रेसचे नगरसेवक कमी पडल्याची कबुली जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

ते म्हणाले, शहरालगत असलेल्या हरितपट्टय़ांवर केवळ हजारांत नव्हे, तर लाखांत घरे झाली आहेत. बहुतांश घरे ही 20 बाय 30 आकाराची असून कोणतेही नियोजन नसताना ही बांधकामे झाली. जाण्यासाठी रस्तेही सोडण्यात आले नाहीत. त्यामुळे शहराचा विकास ठप्प झाला आहे. याविरोधात आम्ही वेळोवेळी ठिकठिकाणी निवेदने दिली. या विरोधात पालिका प्रशासन काहीही करत नसल्याचे लक्षात येताच शेवटी न्यायालयात धाव घेतल्याचेही त्यांनी सांगितले. प्रशासन काहीच करत नाही, अशा वेळी नगरसेवक काय करतात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

अवैध बांधकामांना सत्ताधार्‍यांचा पाठिंबा
अवैध बांधकामांना पालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीचा पाठिंबा असल्याचाही आरोप त्यांनी केला. त्यांची इच्छा असल्याखेरीज बांधकामे होऊच शकत नाहीत. बांधकाम विभागातील अधिकारी सत्ताधार्‍यांच्या सांगण्यावरूनच अवैध बांधकामाकडे दुर्लक्ष करत असल्याचे त्यांनी सांगितले.