आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation Revenue Department Stop Their Work

मनपा वॉर्ड "इ'मधील गुंठेवारी विभाग सात महिन्यांपासून बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महानगरपालिकेकडे निधी नसल्याने अनेक विकासकामे रखडली आहेत. दुसरीकडे कोट्यवधींचा महसूल मिळवून देणारे गुंठेवारी कक्ष बंद असल्याने मनपाचा महसूल बुडत असल्याचे समोर आले आहे. याविषयी अधिकारी मात्र प्रशासनाकडे बोट दाखवून मोकळे झाले आहेत.
मनपाच्या वॉर्ड इ कार्यालयात गुंठेवारीतील मालमत्ता नियमित करण्यासाठी कक्ष स्थापन करण्यात आला. मात्र, हा कक्ष गेल्या सात महिन्यांपासून बंद असल्याचे गुरुवारी समोर आले. गुंठेवारीसाठी नियुक्त केलेले रामदास गोपाळघरे, श्रीकांत वैद्य, विनोद परदेशी यांना सात महिन्यांपासून वसुलीचे काम देण्यात आले आहे. त्यामुळे गुंठेवारीचे कामच बंद पडले आहे.
नागरिक गुंठेवारीचे पैसे भरण्यास तयार असूनही कार्यालयात कर्मचारी नसल्याने मनपाचेच नुकसान होत आहे. शिवाय सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. इ वॉर्डात सर्वाधिक गुंठेवारी भाग असून आतापर्यंत येथे चार हजार ५६९ फाइली जमा झाल्या आहेत. त्यातून ४ कोटी ३४ लाख ५५ हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे. उर्वरित एवढ्याच मालमत्ता गुंठेवारीत नियमित करायच्या बाकी असून यातून कोट्यवधीचा महसूल मनपाला मिळणार आहे. नागरिक कार्यालयात येतात, मात्र कक्षच बंद असल्याने त्यांना वारंवार चकरा माराव्या लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

गुंठेवारीची स्थिती
वॉर्ड "इ'मध्ये असलेल्या १६ वॉर्डांपैकी १० वॉर्ड गुंठेवारीचे आहेत. यात लहान-मोठ्या ३५ वसाहती असून त्यात आठ हजार ५०० कुटंुब राहतात. त्यातून चार हजार ५६९ मालमत्ता नियमित करण्यात आल्या आहेत. आणखी तीन हजार

९३१ मालमत्ता गुंठेवारीत नियमित होणे बाकी आहे. त्यातून मनपाला तीन कोटी ७३ लाख ४४ हजार ५०० रुपयांचा महसूल मिळू शकतो.

या भागात जास्त गुंठेवारी
पुंडलिकनगर, भारतनगर, विजयनगर, न्यायनगर, जयभवानीनगर, अंबिकानगर, विश्रांतीनगर, हनुमाननगर, हिनानगर, सावित्रीनगर, अमानउल्ला मोतीवाला कॉलनी, चौधरी कॉलनी, हनुमान चौक, पुष्पक गार्डन, शहानगर, जयभारत कॉलनी, श्रीकृष्णनगर, प्रतापनगर, अंबिकानगर, संतोषीमातानगर, राजीव गांधीनगर, गजानननगर, लोकशाही कॉलनी, बालाजीनगर, गारखेडा परिसराचा समावेश आहे.
पैसे भरण्यास तयार
-नागरिक पैसे भरण्यासाठी तयार आहेत. मात्र, कर्मचारी येथे नसल्याने नागरिकांची परवड होत आहे. कर्मचारी देण्याची मागणी केली, तर तेही मनपाकडून होत नाही.
दिग्विजय शेरखाने, सभापती, वॉड ई

नवीन घरे नियमित नाही
-पूर्वी दाखल केलेल्या घरांच्या फायली नियमित करण्यात आल्या. नवीन फायली अद्यापही प्रलंबित आहेत. मुदतवाढ देऊन २००५ पर्यंत करण्याचा प्रस्ताव तयार करून पाठवला आहे.
सविता भगवान घडामोडे, नगरसेविका
माझ्याकडे फायली आणून द्याव्यात
-दोन कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यासाठी आयुक्त, महापौर, अास्थापना यांना पत्र देऊनही कर्मचारी दिले नाहीत. त्यामुळे नागरिकांनी थेट माझ्याकडे किंवा डी.पी. कुलकर्णी यांच्याकडे फायली आणून द्याव्यात. आर. एन. संधा, गुंठेवारी कक्षप्रमुख