आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कायदेशीर लढाईची ‘समांतर’ तयारी, लवादाच्या तयारीत महानगरपालिका प्रशासन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मनपाने समांतरचा करार रद्द करण्याबाबत निर्णय घेतला असला तरी आता प्रत्यक्ष कायदेशीर लढाईला प्रारंभ होणे बाकी आहे. महापालिका प्रशासनाच्या पातळीवर लवादाची तयारी करण्याची पूर्वतयारी सुरू झाली आहे, तर औरंगाबाद सिटी वाॅटर युटिलिटी कंपनीत मनपाने दिलेल्या करार रद्द करण्याच्या नोटिसीला उत्तर देण्यासाठी लगबग सुरू आहे.

३० जून रोजी सर्वसाधारण सभेने समांतर जलवाहिनीचा सिटी वाॅटर युटिलिटीसोबतचा करार रद्द करण्याचा निर्णय घेऊन कंपनीला नोटीस पाठवली. करार रद्द करण्याच्या या नोटीसीला उत्तर देण्यासाठी कंपनीला ३० दिवसांचा कालावधी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनपा प्रशासन आता लवादाच्या तयारीला लागत आहे. कागदपत्रांची जुळवाजळव मनपाच्या स्तरावर सुरू आहे.

त्रिसदस्यीय लवाद
लवाद कायद्याच्या कलम ३४(१) नुसार मनपाने करार का रद्द करण्यात येऊ नये, अशी नोटीस दिली आहे. ३० दिवसांत कंपनीने उत्तर दिल्यावर त्याची पडताळणी करून कलम ३७ नुसार प्रत्यक्ष करार रद्द करण्याची नोटीस मनपा देईल. त्यानंतर विविध देणी दाव्यांसंदर्भात जर दोन्ही पक्षांना समोरासमाेर बसून मार्ग काढता आला तर लवादाची गरज भासणार नाही. पण येथे कोट्यवधी रुपयांचा प्रश्न असल्याने प्रकरण लवादात जाणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे त्यानंतर लवादाची स्थापना होईल. त्यात तीन सदस्य राहणार असून एक कंपनी नियुक्त करेल, एक मनपा नियुक्त करेल तिसरा तांत्रिक विषयाचा अभ्यास असणारा सदस्य दोन्ही पक्ष समन्वयाने नियुक्त करतील.
पुढे वाचा..

> कंपनीलाही लवाद हवाच
>तक्रारींचा निपटारा अत्यल्प
>कंपनीत धावपळ, लगबग
बातम्या आणखी आहेत...