आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation Worker Salary Cut Issue Aurangabad

पालिकेतील कर्मचार्‍यांच्या वेतनात होणार कपात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - भांडून एरिअर्स पदरात पाडून घेणार्‍या अधिकार्‍यांनी वर्ग 3 आणि 4 च्या दैनिक वेतनावरील 222 कर्मचार्‍यांना देण्यात येणार्‍या वाढीतून तीन महिन्यांची वाढ रोखण्याचा प्रकार महानगरपालिकेत घडत आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या थकबाकीचे 8 लाख 14 हजार 320 रुपये न देण्यासाठी मनपाच्या खराब आर्थिक स्थितीचे कारण पुढे करण्यात आले असून या कर्मचार्‍यांना ही वाढ थेट जानेवारी 2013 पासून देण्याबाबत प्रस्ताव बुधवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत मांडला जाणार आहे.

मनपात दैनिक वेतनावर काम करणारे वर्ग 3 चे 66 तर वर्ग 4 चे 156 असे एकूण 222 कर्मचारी कार्यरत आहेत. सध्या वर्ग 3 च्या कर्मचार्‍यांना प्रतिदिन 365 रुपये तर वर्ग 4 च्या कर्मचार्‍यांना प्रतिदिन 295 रुपये दिले जातात. या रकमेत वाढ करण्यासंदर्भात कालेलकर समितीने शिफारशी केल्या होत्या. त्यानुसार वर्ग 3 च्या कर्मचार्‍यांना 65 रुपये वाढ देण्याची व वर्ग 4 च्या कर्मचार्‍यांना 45 रुपये वाढ ऑक्टोबर 2012 पासून लागू करण्याचीही शिफारस करण्यात आली होती. या वाढीमुळे मनपाच्या तिजोरीवर दरमहा 2 लाख 71 हजार 440 रुपयांचा आणि दरवर्षाला 32 लाख 25 हजार 280 रुपयांचा भार पडणार आहे. मात्र, आर्थिक स्थिती गंभीर असताना ही वाढ ऑक्टोबर 2012 पासून न करता 1 जानेवारी 2013 पासून लागू करावी, अशा हालचाली प्रशासनाने सुरू केल्या.