आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्वासनांवरच गेले तीन महिने, पूर्वाश्रमीच्या सातारा-देवळाई न. प. कर्मचाऱ्यांवर काम बंद करण्याची वेळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सातारा-देवळाईनगर परिषदेचे महानगरपालिकेत विलीनीकरण केल्यानंतरही नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत. समावेशानंतरचे तीन महिने पगार मिळेल, या आश्वासनावरच गेले. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांवर काम बंद करण्याची वेळ आली आहे. कर्मचाऱ्यांनी बुधवारी पुन्हा एकदा मनपा उपायुक्तांना निवेदन देऊन पगार करण्याची मागणी केली.

तत्कालीन ग्रामपंचायतीत कामाच्या स्वरूपानुसार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर नगर परिषद आता महानगरपालिकेत समावेश झाल्याने कर्मचाऱ्यांचेही विलीनीकरण करण्यात आले. मनपात विलीनीकरण झाल्यानंतर मनपा प्रशासनाने सर्व कर्मचाऱ्यांना स्वतंत्र कामाची जबाबदारीही सोपवली. मात्र मनपाचे काम करूनही पगार नाही, अशी वेळ सध्या कर्मचाऱ्यांवर आली आहे. ऑगस्ट रोजी उपायुक्त आयुब खान यांनी वॉर्ड कार्यालयाला भेट देऊन कर्मचाऱ्यांचा अहवाल मागवला होता. त्यानंतर एक ते दाेन दिवसांत प्रक्रिया पूर्ण करून पगार करण्याचे आश्वासनही खान यांनी दिले होते, परंतु त्यानंतर यावर कुठलीही प्रक्रिया पार पडलेली दिसत नाही. त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा पगारही रखडला आहे. बुधवारी कर्मचाऱ्यांनी पुन्हा उपायुक्त किशोर बोर्डे आयुब खान यांची भेट घेऊन पगारासाठी निवेदन िदले.

एकूण ४३ कर्मचारी
सध्याएकूण ४३ कर्मचारी आहेत, परंतु त्यापैकी सात कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीवर घेतले असल्याने त्यांच्या समावेशावर प्रश्नचिन्ह आहे, परंतु उर्वरित सहा कर्मचाऱ्यांबाबत मनपा अजूनही उदासीन दिसत आहे. समावेशाचे नंतर पाहिले जाईल, पण आधी थकीत पगार देण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.