आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation's Potholes Take Teacher Life

महापालिकेच्या खड्ड्याने घेतला शिक्षकाचा बळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बाबा पेट्रोलपंप ते रेल्वेस्टेशन रस्त्यावर पाइपलाइन दुरुस्तीसाठी खोदलेल्या खड्ड्यामुळे दुचाकी घसरून जखमी झालेल्या शिक्षकाचा शुक्रवारी मृत्यू झाला. सिद्दिकी रिझवान अली अकबर अली (३१ रा. लेबर कॉलनी) असे या शिक्षकाचे नाव आहे. रिझवान नवाबपुरा येथील एका संस्थेवर शिक्षक होते.

शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास रिझवान यांचा मित्र नांदेडहून औरंगाबादला रेल्वेने येणार होता. त्याला घेण्यासाठी रिझवान दुचाकीवर निघाले होते. आरटीओ कार्यालयासमोर पाइपलाइनच्या दुरुस्तीसाठी महापालिकेच्या कंत्राटदराने खड्डा खोदला होता. काम पूर्ण होऊनही हा खड्डा नीट बुजवला नव्हता. दरम्यान रिझवान यांची दुचाकी या खड्ड्यामुळे घसरल्याने ते रस्त्यावर पडले. नागरिकांनी त्यांना उपचारासाठी घाटीत दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा दुपारी मृत्यू झाला. याच खड्ड्यामुळे रिक्षातून एक महिलाही पडली असून तिचाही उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचे कळते. रिझवान यांच्यासाठी नमाज जनाजा शहागंज येथील मशिदीत झाला असून काली मशीद कब्रस्तान येथे दफनविधी करण्यात आला. ज्या कंत्राटदाराने या पाइपलाइन दुरुस्तीचे काम केले त्याच्या विरोधात क्रांती चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे रिझवानच्या नातेवाइकांनी सांगितले. रिझवान यांना नुकतीच मुलगी झाली असून त्यांच्या पश्चात पत्नी, बहिणी, भाऊ आहे.