औरंगाबाद - महानगरपालिकेत भाजपचे २२ नगरसेवक निवडून आले आहेत. यातील अनेक नवीन चेहरे आहेत. नवीन नगरसेवकांना सुरुवातीला काम करण्यात अडचणी येतात. त्यामुळे त्यांना सहकार्य करून कामे कशी करून घ्यावी, याची माहिती देण्याची जबाबदारी भाजपने जुन्या नगरसेवकांवर टाकली आहे.
शनिवारी उपमहापौर प्रमोद राठोड यांनी भाजप नगरसेवकांची बैठक घेतली. चांगली कामगिरी करण्यासाठी नवीन नगरसेवकांना जुन्या अनुभवी नगरसेवकांनी मार्गदर्शन करावे, असे ठरले. त्यानुसार प्रमोद राठोड यांच्याकडे अर्चना नीलकंठ, दिलीप थोरात, विमल केंद्रे, माधुरी अदवंत यांचे पालकत्व देण्यात आले. विजय औताडे पुष्पा रोजतकर यांची जबाबदारी राजगौरव वानखेडे यांच्याकडे, शोभा वळसे, सुरेखा खरात यांची जबाबदारी नितीन चित्ते यांच्यावर सोपवण्यात आली. कमल नरोटे, ज्योती नाडे, बबिता चावरिया, रामेश्वर भादवे यांची जबाबदारी बारवाल यांच्यावर सोपविली आहे.
राखी देसरडा आणि शिवाजी दांडगे यांना राजू शिंदे मार्गदर्शन करतील. मनीषा मुंढेची जबाबदारी बापू घडामोडे यांच्यावर आहे. यात केवळ पूनमचंद बमणे यांच्याकडे कुणाची जबाबदारी देण्यात आली नाही.
असे आहेत जुने-नवे चेहरे
नवीन चेहरे : पुष्पा रोजतकर, विजय औताडे, शोभा वळसे, सुरेखा खरात, बबिता चावरिया, रामेश्वर भादवे, शिवाजी दांडगे, राखी देसरडा, जयश्री कुलकर्णी, माधुरी अदवंत, ज्योती नाडे, मनीषा मुंढे, विमल केंद्रे, दिलीप थोरात, अर्चना नीलकंठ.
जुने चेहरे : पूनमचंद बमणे, राजगौरव वानखेडे, नितीन चित्ते, राजू शिंदे, कमल नरोटे, बापू घडामोडे, प्रमोद राठोड.
शिकवणी
(फोटो : उपमहापौर प्रमोद राठोड यांनी भाजप नगरसेवकांची बैठक घेतली वॉर्डाप्रमाणे पाण्याचा आढावा घेतला. छाया : मनोज पराती.)