आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corproation Fund For Cricket Match Aurangabad

कर्जात बुडूनही पालिका उदार; क्रिकेट स्पर्धेला मदतीचा ठराव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औंरगाबाद - शहरातील विकासकामांना पैसे नाहीत म्हणून वेळोवेळी वेगवेगळी कर्जे काढण्यात येत असली तरी प्रत्यक्षात पालिका प्रशासन कमालीचे उदार असल्याचे समोर आले आहे. गेल्या महिन्यात पालिकेने संस्था, खासगी संघटनांना 30 लाख रुपयांचे वाटप केले आहे. एका खासगी मित्रमंडळाने आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेला 2 लाख रुपये देण्याबाबतचा अशासकीय प्रस्तावही गुरुवारच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात आला होता.

सर्वपक्षीय सहकार्य : जायंट्स इंटरनॅशनलला मदत देण्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक सरसावले होते. महापौर चषकासाठी भाजप नगरसेवकांत स्पर्धा होती. तर शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धेसाठी मदतीची राष्ट्रवादीची मागणी होती. गरुडझेप बहुउद्देशीय युवा मंचप्रणीत गरुडझेप मित्रमंडळाच्या वतीने आयोजित स्पर्धेला मदत देण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीत युती झाली आहे.