आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर परिषदेच्या संदर्भाने सातारा देवळाईत पुन्हा चर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद | महानगरपालिकेतील समावेशा संदर्भात हरकती आक्षेप मागवण्यात आल्यानंतर सातारा-देवळाईत रोज नव्या चर्चेला उधाण येत आहे. नगर परिषद करण्यासंदर्भात पुन्हा नव्याने हालचाली सुरू झाल्याच्या चर्चेने मंगळवारी कार्यकर्त्यांमध्ये तात्पुरते का होईना चैतन्य निर्माण झाले आहे. मंगळवारी दुपारपासून परिसरात नगर परिषदेच्या चर्चा रंगल्या होत्या. मंत्रालयातून जिल्हाधिकारी कार्यालयाला नगर परिषदेसंदर्भात पत्र प्राप्त झाले आहे, असा संदेश आल्याचे वृत्त पसरले. मुंबई स्तरावरून पुन्हा नव्याने नगर परिषदच कायम ठेवण्यासाठी सकारात्मक वातावरण झाल्याचेही बोलले जात होते. व्हॉट्सअॅपवरून या चर्चेला गती मिळाली. कार्यकर्त्यांनीही पक्षाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांशी तत्काळ संपर्क साधून यासंदर्भात शहानिशा करण्याचा प्रयत्न केला. मात्र मंगळवारी रात्रीपर्यंत नगर परिषदेसंदर्भात पत्र मिळाल्याच्या चर्चेला अधिकृत दुजोरा मिळाला नाही.