आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमआयएम आणि शिवसेनेचा विरोध धुडकावून मनपाचे शिष्टमंडळ चीन दौऱ्यावर रवाना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- चीन दौऱ्यावर जाणाऱ्या शिष्टमंडळास एमआयएम आणि शिवसेनेने विरोध केला होता. त्यामुळे सेनेच्या राजेंद्र जंजाळ यांनी दौऱ्यातून माघार घेतल्याचे शनिवारीच सांगितले हाेते. मात्र रात्री उशिरा पुन्हा दौरा निश्चित केल्याने मनपाचे पाच सदस्यीय शिष्टमंडळ रविवारी मुंबईमार्गे चीनच्या दौऱ्यावर रवाना झाले. 

दौऱ्यावर जाण्यावरून शनिवारी रात्री उशिरापर्यंत सेनेत खलबते सुरू होती. त्यामुळे अगोदर दौऱ्यातून माघार घेतल्याचे सांगण्यात आले होते. रात्री पुन्हा दौऱ्यात जाणार असल्याचे जंजाळ यांनी सांगितले. त्यामुळे रविवारी शिष्टमंडळ दौऱ्यावर गेले. यात महापौर भगवान घडमोडे, आयुक्त दीपक मुगळीकर, भाजपचे गटनेते प्रमोद राठोड, नगरसेवक कचरू घोडके आणि नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांचा समावेश आहे. 

चीनमधील ड्यूनहाँग शहरात १२ ते १६ जुलैदरम्यान ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज अंॅड लोकल गव्हर्नमेंट को-ऑपरेशन फोरमची परिषद होत आहे. ड्यूनहाँग शहराशी काही वर्षांपूर्वीच औरंगाबाद महानगरपालिकेचा सिस्टर सिटीचा करार झालेला आहे. त्यामुळे परिषदेसाठी औरंगाबाद मनपाच्या शिष्टमंडळालाही निमंत्रित करण्यात आले आहे. दौऱ्याचा खर्च चीन सरकार करणार आहे. १६ जुलै रोजी शिष्टमंडळ परतणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...