आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाने दिवसभरात हटवल्या १४ मालमत्ता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मनपा प्रशासनाने राजाबाजार ते बायजीपुऱ्यापर्यंत रस्ता रुंदीकरण मोहीम हाती घेतली असून, गुरुवारी दिवसभरात १४ मालमत्ता मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने पाडल्याची माहिती अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख रवींद्र निकम यांनी दिली.
मनपाने २००२ मधील विकास आराखड्याच्या आरक्षणानुसार १६ रस्त्यांचे रुंदीकरण करण्याची मोहीम सुरू केली आहे. राजाबाजार ते बायजीपुऱ्यापर्यंतचा रस्ता रुंद करण्याचे काम सुरू आहे. गुरुवारी खुलताबाद येथील उरुसानिमित्त शासकीय सुटी होती. तरीही मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने दिवसभर जिन्सी भागातील खास गेटच्या बाजूच्या १४ मालमत्ता हटवल्या. मनपाने पाचव्या दिवशी ४८ मालमत्ता पाडण्याचे काम पूर्ण केले आहे. अजून दीडशे मालमत्ता पाडण्याचे काम या पथकाला करावे लागणार आहे. सुरुवातीला गंजे शहिदा कब्रस्थान मशिदीपर्यंत रस्ता रुंदीकरण करण्याचे काम हाती घेतले. आता बायजीपुऱ्यापासून पुढे एमजीएमपर्यंतचा रस्ता रुंद करण्याचे नियोजन केले आहे. मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू आहे.

भाजीवालीबाई चौक रस्त्यावर मार्किंग : मनपानेएकूण १६ रस्ते करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात आठ दुसऱ्या टप्प्यात आठ रस्ते करण्यात येणार आहेत. राजाबाजार ते बायजीपुरा रस्ता रुंदीकरण प्रक्रिया सुरू असतानाच नगररचना विभागाने भाजीवालीबाई चौक ते उत्सव मंगल कार्यालयपर्यंतच्या रस्त्यावर मार्किंग केले. येथील ४० मालमत्ता बाधित होणार आहेत.

वेळेतमोहीम पूर्ण करण्याचे आवाहन : मार्च अखेर मनपाला १६ रस्त्यांवरील मार्किंग, भूसंपादन करण्यासह बाधित होणाऱ्या मालमत्ता हटवून त्यावर रस्ता तयार करावा लागणार आहे. ही मोहीम हाती घेऊन सहा दिवस झाले तरी, अद्यापपर्यंत निम्म्या रस्त्यावरील एका बाजूच्या मालमत्ता पाडण्याचे काम करता आले नाही. त्यामुळे कमी वेळेत जास्त काम करण्याचे काम मनपाला करावे लागेल.

मंदिर,मशिदींचा प्रश्न सोडवावा लागेल : जिन्सीभागात सुरू असलेल्या मोहिमेतील रस्त्यावर चार धार्मिक स्थळे बाधित होत आहेत. यात दोन मंदिरे, एक मशीद, एक कब्रस्थानच्या मशिदीचा समावेश आहे. एक मंदिर विधिवत पूजा करून हटविण्यात आले आहे. मात्र अद्याप इतर तीन धार्मिक स्थळांचा प्रश्न बाकी आहे. मनपा आयुक्तांना हा प्रकार सांगणार दरम्यान, आम्ही या रस्त्यांचे काम करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र मनपा अधिकाऱ्यांकडून मालमत्ता पाडण्यात दुजाभाव करण्यात येत आहे, असा आरोप नगरसेवक फिरोज खान यांनी केला. तर या मोहिमेत सुरुवातीला इतर घरांना बाधा पोहोचू नये असा विचार करून बांधकाम अर्धवट पाडण्यात आल्यावर थांबविले होते. मात्र नंतर पाहणी करून पूर्ण बांधकाम पाडण्यात आल्याचे निकम यांनी सांगितले.

कर्मचाऱ्याचे एक घर वाचविण्याचे प्रयत्न
सिद्धेश्वर महादेव मंदिराला लागून चौथ्या क्रमांकाचे घर पीडब्ल्यूडीत कार्यरत असलेल्या वाहेद शेख यांचे घर आहे. पथकाने या घराचा काही भाग तोडला होता. मात्र उपायुक्त रवींद्र निकम यांनी उर्वरित घर पाडू नये, असे आदेश पथकाला दिले. त्यामुळे हे घर पाडता पुढील घरांची पाडापाडी सुरू करण्यात आली. यास नगरसेवक फिरोज खान यांनी आक्षेप घेतला होता.
बातम्या आणखी आहेत...