आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपची वॉर्डनिहाय बैठकांतून संभाव्य उमेदवारांची चाचपणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मनपा निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून वॉर्डनिहाय बैठकांचे सत्र हाती घेण्यात आले आहे. नागरी समस्या जाणून घेत संभाव्य उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. सध्या हे सत्र औरंगाबाद पूर्व मतदारसंघात सुरू असून त्याची सूत्रे आमदार अतुल सावे यांनी स्वत:कडे घेतली आहेत.

एप्रिल २०१५ मध्ये महापालिकेच्या निवडणुका आहेत. प्रशासनाने प्रभागनिहाय निवडणुकीची तयारी केली असली तरी त्याला भाजपने कडाडून विरोध दर्शवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही तशी मागणी करण्यात आली असून त्यावर अंतिम निर्णय बाकी आहे. तरीही भाजपने वॉर्डनिहाय निवडणुकाच होतील, असे गृहीत धरून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. स्वबळावर लढताना काही वॉर्डांत उमेदवारांची चणचण भासणार आहे. ऐनवेळी शोधाशोध करावी लागू नये. बाहेरून कोणाला आयात करण्याची नामुष्की येऊ नये, यासाठी आतापासूनच तयारी केली जात आहे. त्यानुसार सावे यांनी नागरिकांशी संवाद, नागरी समस्या जाणून घेणे आणि त्यासोबतच निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार शोधणे असे सूत्र समोर ठेवत बैठका सुरू केल्या आहेत.
सध्या औरंगाबाद पूर्वमध्ये ३४ वॉर्ड आहेत. त्यामध्ये शिवसेनेचे १० नगरसेवक भाजप ४, तर काँग्रेस ८ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ०६ नगरसेवक आहेत. त्यातील किमान २० वॉर्डांत भाजपला यश मिळावे, अशी त्यांची अपेक्षा आहे.