आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Election Preparations Of The Republican Panthers

सत्तांतर करू; ग्लोबल सिटी बनवू, पक्षांसोबत मनपा जिंकण्याचा गंगाधर गाडे यांना विश्वास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पर्यटनाची राजधानी औरंगाबादला आत्तापर्यंत ‘भकास’ ठेवण्याचे काम स्थानिक नेत्यांनी केले. मागील २५ वर्षांपासून मनपात निरंकुश सत्ता असतानाही युतीच्या नेत्यांनी शहराचा बट्याबोळ केला. म्हणूनच आगामी निवडणूकीत समविचारी पक्षांसोबत आघाडी करून सत्तांतरे करू. त्यानंतर या शहराला ‘ग्लोबल सिटी’ करण्याचा आपला संकल्प असल्याचे पँथर्स रिपब्लिकनचे पक्षाध्यक्ष गंगाधर गाडे यांनी म्हटले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’ने त्यांची मते जाणून घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
संयुक्तपणे निवडणुका लढवण्याविषयी एमआयएमसह इतर समविचारी पक्षांसोबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. आमदार इम्तियाज जलील यांच्याशीही प्राथमिक चर्चा झालेली आहे. ‘पँथर्स’४० जागा लढवणार असून फक्त राखीवच नव्हे तर सर्व जाती-धर्मियांच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सत्ताधारी पक्षांची कोंडी करण्यात येणार आहे. मनपामध्ये दलित-मुस्लीम-ओबसी यांची वज्रमुठ करून युती आणि काँग्रेस आघाडीला सक्षम पर्याय देण्यात येईल. सत्तांतरे करून ऐतिहासिक शहराला खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय पातळीवरील नेण्याचा आपला मानस आहे. त्यासाठी जनतेच्या प्रश्नांवर मतदारांना जागृत करण्याचे काम पक्ष करणार असल्याचे गाडे यांनी सांगितले. आमचे संपूर्ण आयुष्य समाजकार्यात खर्च झालेले असून समाजसेवा हेच आपले भांडवल आहे. त्यामुळे ४० जागांवर ‘पँथर्स’ लढल्यास जनतेचा विश्वास मिळवूच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुंडेंच्या आठवणीने भावनाविवश
गोपीनाथ मुंडे मराठवाड्याचे नेते होतेच, त्यांच्यासोबत खूपच मैत्री होती. शिवाय त्यांनी आपल्याला भाजपसोबत आघाडी करण्याचा प्रस्तावही ठेवला होता. त्यावेळी त्यांनी मला मंत्रीपद देण्याचे आश्वासन दिले होते. पण त्यांना समजून घेण्यात आपली मोठी घोडचुक झाल्याचे त्यांनी मान्य केले.