आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाची वीज तोडण्याचा महावितरणने दिला इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एलबीटीचा खड्डा कसा भरून येणार याची चिंता असणाऱ्या मनपाला आता वीज मंडळाची थकबाकी भरण्याची चिंता भेडसावू लागली आहे. आठ कोटी रुपयांचे वीज बिलाचे पैसे आठ दिवसांत भरा नाहीतर मुख्य इमारत, संत एकनाथ रंगमंदिर सिद्धार्थ उद्यानाची वीज तोडू अशी नोटीसच महावितरणने बजावली आहे. दुसरीकडे २०० कोटी रुपयांचा खड्डा भरून काढण्यासाठी शासनाने किमान अडीचशे कोटी मनपाला द्यावेत, अशी मागणी स्थायी समिती सभापतींनी केली आहे.
सरकारने ऑगस्टपासून एलबीटी रद्द करण्याची घोषणा केली ५० कोटी रुपयांच्या पुढे वार्षिक उलाढाल असणाऱ्यांकडूनच मनपाने कर वसूल करावा असे सांगितले आहे. साधारणपणे मनपाला प्रतिवर्षी दोनशे कोटींचा महसूल देणारा एलबीटी रद्द झाला, तर किमान २०० कोटी तरी मनपाला मिळायला हवेत अशी अपेक्षा आहे. पण सरकारने काहीच कळवलेले नाही. महानगरपालिकेचा अत्यावश्यक खर्च सगळा एलबीटीवरच अवलंबून असतो. महिन्याकाठी एलबीटीतून येणाऱ्या २४ कोटीतून महापालिका पगारावर ११ कोटी, शिवाय वीजबिल, समांतरला द्यायचे पैसे, वीजबिल, कर्जाची परतफेड इतर अत्यावश्यक खर्चाचे १० कोटी वापरत असते. मालमत्ता कराची वसुली ३५ टक्क्यांच्या वर नसल्याने तो आकडा वर्षाला ८० कोटीपर्यंतही जात नाही. त्यामुळे आता एक आॅगस्टनंतर मनपाचे पगाराचे वांधे होणार आहेत, शिवाय कर्जाचे हप्तेही थकण्याची शक्यता आहे.
मनपाची दारे झाली बंद
मनपानेवीज मंडळाला एलबीटी आकारल्यानंतर महावितरणकडे दहा कोटी रुपये थकले होते. या रकमेतून वीजबिलाचे समायोजन करण्याच्या हालचाली मनपाने सुरू केल्या होत्या. पण सरकारने महावितरणवर एलबीटी लावता येणार नाही असे कळवून मनपाचे संधीचे ते दारही बंद केले. आता आठ कोटी उभे करण्याचे संकट मनपासमोर उभे ठाकले.
महावितरणची नोटीस
अशीस्थिती असताना मनपाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या आर्थिक संकटात आता महावितरणने भर टाकली आहे. मनपाचे वीजबिलाचे सुमारे आठ कोटी रुपये थकले आहेत. हे बिल आठ दिवसांत भरा नसता मनपाचे मुख्यालय, संत एकनाथ रंगमंदिर सिद्धार्थ उद्यान यांचा वीज पुरवठा तोडला जाईल असा इशारा देणाारी नोटीस महावितरणने पाठवली आहे. हे आठ कोटी रुपये आणायचे कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दुसरीकडे स्थायी समिती सभापती दिलीप थोरात यांनी नगरविकास सचिवांना पत्र लिहिले असून एलबीटी बंद केल्याने मनपाचे १९० कोटी रुपयांचे नुकसान होणार असून वेतन, ड्रेनेज, वीज, दैनिक साफसफाई, पाणीपुरवठा इतर विकासाच्ी कोणतीही कामे करता येणार नाहीत.