आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Employees,latest News In Divya Marathi

पालिका कर्मचा-यांचा लेखाधिका-यांना घेरावा, 16 नंतर काम बंदचा इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शंभर कोटींच्या देयकांसाठी ठेकेदारांनी आयुक्त दालनास धडक दिल्याची घटना सोमवारी घडल्यानंतर लगेचच मंगळवारी (दि. 14) महापालिका कर्मचाऱ्यांनी लेखाधिकाऱ्यांना घेराव घालून दिवाळीपूर्व सानुग्रह अनुदान मिळाले नाही तर १६ ऑक्टोबरपासून कामकाज बंद पाडण्याचा इशारा दिला.
एलबीटी लागू झाल्यानंतर महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली असून, त्यात सिंहस्थ व महत्त्वाच्या कामांसाठीच निधी वापरला जात आहे. अशा परिस्थितीत विद्युतसारख्या छोट्या विभागाची कामे करणाऱ्या ठेकेदारांची देयके अडवल्यामुळे त्यांनी सोमवारी आंदोलन केले. एकीकडे ठेकेदारांची देयके पडून असताना, दुसरीकडे कर्मचाऱ्यांचे हक्काचे १३ हजार १०० रुपये असे सानुग्रह अनुदानही रखडले. त्यामुळे नाशिक म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष तथा नगरसेवक अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळांनी लेखाधिकारी राजेश लांडे यांची भेट घेतली. त्यावेळी लेखाधिकाऱ्यांनी आयुक्तांशी चर्चा केल्यानंतरच अनुदान देऊ, अशी भूमिका घेतली. मात्र, कर्मचाऱ्यांनी आक्रमक होत आयुक्तांनी यापूर्वीच आदेश देऊन अनुदान देण्याची वाट मोकळी केल्याचा दावा केला.
पुन्हा आयुक्त - लेखाधिकाऱ्यांमध्ये टोलवाटोलवी : महापालिकेच्या प्रभारी आयुक्त सोनाली पोंक्षे-वायंगणकर यांनी 11 सप्टेंबर रोजी आदेश काढून दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदान देण्याची कारवाई करावी, असे स्पष्ट केले होते. मात्र, लेखा विभागाकडून कारवाई होत नसल्यामुळे कर्मचारी संघटना आक्रमक झाली. कोणत्याही परिस्थितीत 16 सप्टेंबरपर्यंत अनुदान दिले तरच दिवाळीपूर्व खरेदी वा अन्य कामांसाठी त्याचा वापर होईल, असा युक्तिवाद कर्मचाऱ्यांनी केला. दुसरीकडे लेखाधिकाऱ्यांनी निवडणुकीचे निकाल 19सप्टेंबर रोजी लागल्यावर आचारसंहिता शिथिल झाल्यावर अनुदान देणे सोपे होईल, अशी भूमिका मांडली. मात्र, कर्मचा-यांनी निकालानंतर येणाऱ्या सुट्यांमुळे हातात अनुदान वेळेत पडणार नाही, असे सांगून आपली भूमिका मांडली.
ठेकेदारांच्या देयकांवर ठेवणार नजर
ह्यएकीकडे कर्मचाऱ्यांची देयके अडवतात. मात्र, दुसरीकडे ठेकेदारांची देयके सहज अदा करतातह्ण, असे सांगत सहाणे यांनी यातील गौडबंगाल माहिती आहे असा आरोप केला. कर्मचाऱ्यांच्या हक्काचे अनुदान देण्यापूर्वी ठेकेदारांची देयके अदा केली तर आंदोलन करू, असा इशाराही िदला. ठेकेदारांच्या देयक रजिस्टरला सील करा तसेच ठेकेदारांना लेखा विभागापर्यंत पोहोचू देऊ नका, अशा सूचना कर्मचा-यांना दिल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, सहाणे यांनी आयुक्तांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क झाला नाही. उपआयुक्त विजय पगार यांच्याकडेही कैफियत मांडण्यात आली.