आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Encroachment Removal Team Hit The Campaign

महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाची धडक मोहीम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अतिक्रमण काढण्यास गेलेल्या पथकाशी हुज्जत घालणाऱ्या युवकाला पोिलसांनी चोप दिला. छाया: मनोज पराती - Divya Marathi
अतिक्रमण काढण्यास गेलेल्या पथकाशी हुज्जत घालणाऱ्या युवकाला पोिलसांनी चोप दिला. छाया: मनोज पराती
औरंगाबाद- गांधी नगरातील मनपाच्या बंद पडलेल्या माध्यमिक शाळेच्या आवारात बांधण्यात आलेले पत्र्याचे बांधकाम आज मनपाच्या पथकाने भुईसपाट केले. या वेळी संबंधित व्यक्तींनी या पथकाशी वादावादी करण्याचा प्रयत्नही केला, पण पोलिसांनी त्यांना रोखल्याने हे बांधकाम नंतर पाडण्यात आले.
गांधीनगरात मनपाची माध्यमिक शाळा आहे. चार वर्षांपूर्वी ही शाळा बंद पडली त्यावर जमीन माफियांची नजर पडली. आताही या आवाराच्या कोपऱ्यात एक दुमजली इमारत उभी आहे चक्क आवाराच्या मधोमध एक पत्र्याचे शेड बांधून तिथे घरही उभारण्यात आले. या बांधकामात चक्क एक किचन, बेडरूम हाॅल अशी रचना करण्यात आली होती. या लगतच्या नाल्यावर होत असलेल्या बांधकामांबाबत नगरसेवक रामेश्वर भादवे यांनी वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या. आज सकाळी नाल्याच्या लगत भराव टाकण्याचे काम सुरू होताच भादवे यांनी महापौर त्र्यंबक तुपे यांच्याकडे धाव घेत त्यांना आता तरी अतिक्रमणे काढा, अशी विनंती केली. यानंतर महापौरांनी अतिक्रमण हटाव पथकाचे शिवाजी झनझन यांना बोलावून विचारणा केली असता हे अतिक्रमण काढण्यासाठी आयुक्तांनी हिरवा कंदील दाखवल्याचे समोर आले. त्यामुळे तातडीने कारवाई करा, अशा सूचना दिल्यानंतर पथक तातडीने रवाना झाले.

अितक्रमण काढण्यास गेलेल्या पथकाशी हुज्जत घालणाऱ्या युवकाला पोिलसांनी चोप दिला. छाया: मनोज पराती

मनपाने दिली होती नोटीस
गुलामअली महंमद हुसेन यांच्या नावावर हे घर असून ते विनापरवाना मनपाच्या जागेत बांधल्याचे मनपाच्या निदर्शनास आल्यावर १७ जून २०१५ रोजी त्यांना नोटीस देण्यात आली होती. आज पथक तेथे पोहोचले पोलिस बंदोबस्तात पाडापाडी सुरू झाल्यावर घरात राहणाऱ्या व्यक्तींनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. काही तरुण तर पथकावर धावूनही गेले, पण पोलिसांनी त्यांना रोखून कारवाईत अडथळा येऊ दिला नाही. एमआयएमचे नगरसेवक फेरोज खान यांना या तरुणांनी फोन करून बोलावून घेतले. खान यांनी याबाबत विचारणा केल्यावर संबंधितांना शांत करण्याचा प्रयत्न केला. अखेर बुलडोझर लावून हे बांधकाम भुईसपाट करण्यात आले.