आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करणा-यांना पालिका निवडणुकीत मतदानाची संधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १० फेब्रुवारी २०१४ पर्यंत नोंदणी केलेल्या नागरिकांना मतदानाची संधी मिळणार आहे. मात्र, यानंतर नोंदणी करणाऱ्या मतदारांना थेट लोकसभा निवडणुकीत मतदानाची संधी उपलब्ध होणार आहे. सध्या शहरात महापालिका निवडणुकीचे वारे वाहत आहेत. सातारा व देवळाईचाही मनपात समावेश झाल्याने निवडणूक आयोगाच्या आदेशाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १० फेब्रुवारी २०१४ पर्यंत ज्यांनी मतदार नोंदणी केली, अशा नागरिकांना महापालिका निवडणुकीत मतदान करता येणार आहे. विधानसभेच्या िनवडणुकांसाठी शहरातील मतदार संख्या नऊ लाख २४ हजार ७८० होती. यानंतर शहरातील केवळ पाच हजार नवीन मतदारांची भर पडली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत नऊ लाख २९ हजार ७८० मतदार मतदानाचा हक्क बजावतील.
पाच हजार जणांची भर-
विधानसभेनंतर मनपाच्या निवडणुका होणार असल्याने स्थानिक पक्षांनी नवख्या मतदारांना हेरून त्यांची नोंदणी करून घेतली आहे. त्यामुळे मतदार यादीत पाच हजार नवीन मतदारांची भर पडली आहे.

साता-यासाठीही तोच नियम लागू
सातारा-देवळाईचा समावेश मनपात करण्यात आला आहे. येथील ४० हजार मतदारांनाही मतदानाचा हक्क बजावता येईल. सोमवारी किंवा मंगळवारी ही यादी मनपाच्या निवडणूक विभागाला मिळेल. यादी प्राप्त झाल्यानंतर वाॅर्डनिहाय त्याच्या छोट्या छोट्या याद्या तयार करण्यात येणार आहेत.