आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठेकेदारांना तीन नंतरच मनपात मिळेल प्रवेश, आयुक्तांचा लेखा विभागाला दणका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मनपाच्या मुख्य इमारतीबाहेर असलेल्या इलेक्ट्राॅनिक किआॅस्कवर बिलांची प्राधान्य यादी अपलोड करा, दुपारी तीननंतर बिलांचे वाटप करा. तीन वाजेच्या आधी एकही ठेकेदार लेखा विभागात दिसता कामा नये, असे ठणकावत आज मनपा आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी झाडाझडती घेतली.
सकाळी साडेनऊ वाजता मनपात आलेल्या केंद्रेकर यांनी दहा वाजता लेखा विभागाला भेट दिली. मागच्या चार दिवसांचा अनुभव पाहून बहुतेक कर्मचारी जागेवर हजर होते. पण मुख्य लेखाधिकारी अशोक थोरात लेखाधिकारी संजय पवार जागेवर नव्हते.
अशोक थोरात यांच्या केबिनमध्ये बसून त्यांनी हजर अधिकारी कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले. थोड्याच वेळात संजय पवार आले. त्यांना उशिरा का आलात याचा जाब विचारला. थोरात का आले नाहीत असे विचारत त्यांनी त्यांच्या घरी माणूस पाठवा, असे आदेश दिले. त्यानंतर एका कर्मचाऱ्याने थोरात यांचे घर गाठत त्यांच्यासोबत मनपात आणले. रजा दिली होती का या आयुक्तांच्या प्रश्नावर त्यांनी एका कर्मचाऱ्याच्या हातून रजा पाठवली होती, असे सांगून वेळ मारून नेली. यानंतर आयुक्तांनी थोरात, पवार लेखाधिकारी एन. जी. दुर्राणी यांच्या दालनात जात तेथे असलेल्या फायलीची पाहणी केली. जवळपास सव्वा तास त्यांनी लेखा विभागात घालवत कामकाजाची माहिती घेतली.

यादीलोड करा
महानगरपालिकेच्यालेखा विभागात ठेकेदारांचा दिवसभर असणारा वावर आयुक्तांना खटकला असून त्यांनी आज त्याबाबत विशेष सूचना केल्या. मनपाच्या इमारतीबाहेर असलेल्या किआॅस्कवर रोजच्या बिलांच्या प्राधान्याचा क्रम असणारी यादी लोड करा. दुपारी वाजेनंतर ठेकेदारांना बिलांचे वाटप करा. तीन वाजेच्या आधी एकही ठेकेदार लेखा विभागात दिसायला नको असा दमच त्यांनी भरला. दिवसभर मनपात भटकंती करणाऱ्या ठेकेदारांना आता चांगलाच चाप बसला आहे.

सुटीच्या दिवशी कार्यालय बंदच
दरम्यान आयुक्त कोणत्याही विभागांना भेटी देऊ शकतात हे ध्यानात आल्यावर गेल्या रविवारी अनेक विभागांनी साफसफाई केली होती कचऱ्याच्या नावाखाली कागदपत्रे जाळून टाकली होती. शिवाय सुटीच्या दिवशी ‘इतर’ कामांना अधिक संधी असल्याने काही अधिकारी कर्मचारी सुटीचा वापर करून घ्यायचे. आता आयुक्तांनी आस्थापना विभागाला सांगून सुटीच्या दिवशी कार्यालय बंदच राहिले पाहिजे, असा आदेश जारी केला.