आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौर नाही, तरी उपमहापौर देणार राजीनामा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शिवसेना भाजपात झालेल्या करारनाम्यानुसार येत्या ३१ ऑक्टोबरला महापौर उपमहापौरांनी राजीनामा देणे अपेक्षित आहे. त्यानंतर भाजपचा महापौर, तर सेनेचा उपमहापौर होईल. महापौर राजीनामा देणार की नाही, हे अजून स्पष्ट झालेले नाही. महापौरांनी राजीनामा दिला नाही तरी करारानुसार आमचा उपमहापौर राजीनामा देईल, असे भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी स्पष्ट केले आहे.
महापौर, उपमहापौरांचा कालावधी अडीच वर्षांचा आहे. त्यांनी राजीनामा दिला नाही तर निवडणूक होण्याचा किंवा नवीन महापौर निवडण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळेच महापौर तुपे उपमहापौर राठोड राजीनामा देणार की नाही, यावर अटकळी लावल्या जात आहेत.

मुंबई पालिकेचा परिणाम?
मुंबईपालिकेत शिवसेनेशी युती करणार नाही, असे वक्तव्य भाजपच्या नेत्यांनी केले होते. त्यावर युती तोडून दाखवाच असे उत्तर सेनेने दिले. याचे पडसाद शहरात उमटू शकतात. २००९ मध्ये दोन्ही पक्षांतील वादामुळे तत्कालीन महापौर विजया रहाटकर यांनी राजीनामा दिला नव्हता. त्यामुळे त्या अडीच वर्षे पदावर राहिल्या. तसे आता होण्याची शक्यता शिवसेनेतील काही सूत्रांनी व्यक्त केली आहे. मात्र, भाजपकडून तसे कोणतेही भाष्य स्थानिक पातळीवर करण्यात आलेले नाही. करारानुसार, पहिल्या एक वर्षासाठी स्थायी समितीचे सभापतिपद भाजपकडे होते. दुसऱ्या वर्षासाठी ते सेनेकडे आले आहे. त्यामुळे या करारात बिघाड होईल, असे भाजप नेत्यांना वाटत नाही. मपौरपद भाजपकडे जाऊ नये, अशी सेना कार्यकर्त्यांची इच्छा लपून राहिलेली नाही.
युतीच्या करारानुसार सर्व काही होईल
^युतीच्या करारानुसार भाजपला एका वर्षासाठी महापौरपद देण्यात आले आहे. त्यानुसारच सर्व काही होईल. त्यामुळे आमच्या पक्षाचे उपमहापौर हे ठरल्याप्रमाणे बरोबर दीड वर्षानंतर राजीनामा देतील. दिवाळीमुळे एक-दोन दिवस मागे पुढे होईल; परंतु जे काही होईल ते करारानुसारच. मुंबईतील वादाचा येथे संबध नाही. -किशनचंद तनवाणी, शहराध्यक्ष, भाजप.
बातम्या आणखी आहेत...