आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैजापूर नगर परिषदेच्या सभापतिपदांची निवड प्रक्रिया बिनविरोध

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूर - वैजापूर नगर परिषदेच्या विषय समित्यांच्या पाच सभापतिपदांची निवड प्रक्रिया 17 जानेवारी रोजी बिनविरोध पार पडली. विषय समित्यांच्या सभापतिपदावर काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या तीन व शिवसेनेच्या दोन नगरसेवकांची वर्णी लागली आहे.
नगरपालिकेच्या फुले-आंबेडकर सभागृहात उपविभागीय अधिकारी मुकेश भोगे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या सभापती निवड प्रक्रियेत सार्वजनिक बांधकाम समिती सभापती म्हणून उपनगराध्यक्ष मजीद कुरेशी, सार्वजनिक पाणीपुरवठा समितीच्या सभापतिपदी संदीप टेके, महिला व बाल कल्याण समिती सभापती म्हणून अफरोज बेगम अब्दुल मलिक, शिक्षण व नियोजन समिती सभापतिपदी रमेश हडोळे, सार्वजनिक आरोग्य विकास समितीचे सभापती म्हणून वसंत त्रिभुवन व स्थायी समिती सदस्यपदी सुनीता जगताप यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सभापतिपदाच्या निवड प्रक्रियेसाठी मुख्याधिकारी बी. यु. बिघोत, अव्वल कारकून फिरोजखान, लेखापाल बाळासाहेब चव्हाण यांनी सहकार्य केले. या वेळी नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, नगरसेवक डॉ. दिनेश परदेशी, साबेर खान आदी उपस्थित होते.
विषय समित्यांची निवड जाहीर - गंगापूर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक आज होऊन त्यामध्ये नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतींची निवड करण्यात आली. निवड करताना 6 जागांपैकी 3 विषय समित्यांच्या सभापतिपदी महिलांची वर्णी लावून महिलांना 50 टक्के महिलांना आरक्षण देण्यात आले.
आज झालेल्या बैठकीत स्थायी समितीचे सभापतीपद नगराध्यक्ष संजय जाधव यांनी स्वत कडे ठेवले असून, स्वच्छता व आरोग्य विभाग उपनगराध्यक्ष फैसल चाऊस यांच्याकडे तर नियोजन व विकास प्रदीप पाटील यांच्याक डे देण्यात आले. महिला व बालकल्याण सभापतीपदी सौ. सुवर्णा जाधव यांची निवड करण्यात आली, पाणीपुरवठा सभापतीपदी शिवसेनेच्या दीपाली भवार तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे सभापतीपद बिजलाबाई साबणे यांच्याकडे देण्यात आले.