आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal New Commissioner Decision In Next Week

नवीन आयुक्त कुणाचे? कदमांचे की दानवेंचे? निर्णय पुढील आठवड्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मनपाआयुक्त प्रकाश महाजन यांना परत पाठवण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेतला असला तरी औरंगाबादला कोण आयुक्त द्यायचा याबाबत पुढील आठवड्यातच निर्णय होणार आहे. महाजनांवरील अविश्वास्त प्रस्ताव मंजुरीत महत्त्वाची भूमिका बजावणारे पालकमंत्री रामदास कदम यांनी नव्या आयुक्तांसाठी थेट मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे ठरवले आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे जालन्याचे जिल्हाधिकारी ए. एस. रंगानायक यांना आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, मनपा पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या कोंडीचे प्रयत्न सुरू केले असून आगामी काळात हा संघर्ष आणखी भडकण्याची चिन्हे आहेत.
काल मंजूर झालेल्या प्रस्तावाचे कारणापुरता उताऱ्यात रूपांतर करून तो नगरविकास मंत्रालयात पाठवावा लागतो. नियमानुसार पाच अष्टमांशपेक्षा अधिक मते अविश्वास ठरावाच्या बाजूने पडल्यास त्या अधिकाऱ्याला सरकारला तत्काळ परत बोलावून घ्यावे लागते. आज या प्रस्तावावरील चर्चेचा निर्णयाचा कारणापुरता उतारा तयार करण्याचे काम सुरू झाले. पण नंतर यासोबतच सभागृहात झालेल्या चर्चेचा वृत्तांतही पाठवावा असा निर्णय घेण्यात आल्याने संवाद ऐकून तो अहवाल तयार करण्याचे काम सुरू झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे काम दोन दिवस चालणारे आहे. त्यात उद्या दसऱ्याची त्यानंतर शनिवार, रविवारची सुटी सोमवारी मूळ प्रस्ताव, कारणापुरता उतारा इतर तपशील मुंबईकडे रवाना होईल. तेथून पुढील आदेश मिळेपर्यंत महाजन तांत्रिकदृष्ट्या आयुक्त आहेत.

रात्रीआले अन् सकाळी गेले : दरम्यान,काल दिवसभर मुंबईत तळ ठोकून असलेले महाजन रात्री उशिरा औरंगाबादेत परतले. आल्या आल्या त्यांनी शिवाजी झनझन यांच्याकडून स्वत:कडे घेतलेला कर निर्धारक संकलकापदाचा कार्यभार उपायुक्त अय्युब खान यांच्याकडे सोपवत असल्याचे कार्यालयीन आदेश, काही कागदपत्रे हातावेगळी करून बुधवारी सकाळी मुंबईत पोहोचले. त्यांनी ‘स्वच्छ महाराष्ट्र’ बैठकीला हजेरी लावली.

आयुक्तांकडे१५८ फायली : दरम्यान,आयुक्तांच्या मदतीला धावलेल्या नगरसेवकांवर आरोप करणाऱ्या अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांचा विरोध आजही कायमच राहिला. महाजनांकडे १५८ फायली पडून आहेत. त्या येत्या दोन-तीन दिवसांत निकाली निघू नयेत याची फिल्डिंग लावण्यात पदाधिकारी गुंतले होते.

आवक-जावकरजिस्टरवर लक्ष : सभागृहनेतेराजेंद्र जंजाळ यांनी सर्व विभागप्रमुखांना संपर्क करून त्यांच्या विभागातील आवक-जावक रजिस्टरच्या नोंदीच्या झेराॅक्स मागवून घेतल्या. काल नगरसेवक पदाधिकाऱ्यांना टार्गेट करणाऱ्या पत्रामागील सूत्रधार शिवाजी झनझन डाॅ. बी. एस. नाइकवाडे असल्याची पदाधिकाऱ्यांना खात्री आहे. या दोघांकडील विभागांच्या आवक-जावक रजिस्टरच्या प्रती त्यांना मिळाल्या नाही.

अधिकाऱ्यांनाघेरणार : पदाधिकारीनगरसेवकांबाबत आरोप करणारे पत्र चांगलेच झोंबले असून आता आम्हीही अधिकाऱ्यांकडून नियमावर बोट ठेवूनच काम करून घेणार आहेत, असे स्थायी समिती सभापती दिलीप थोरात म्हणाले. एखादी फाइल किती दिवसांत मार्गी लावायची याचेही नियम आहेत. आता त्या नियमांनुसार आम्ही अधिकाऱ्यांकडून काम करून घेऊ, अशी पुस्ती त्यांनी जोडली.

दानवेंच्या मर्जीतील...
भाजपचेप्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे कार्यक्षेत्र असलेल्या जालना जिल्ह्याचा कारभार जिल्हाधिकारी ए. एस. रंगानायक चालवत आहेत. गेल्या दीड वर्षात त्यांचे दानवेंशी चांगले सूत जुळल्याने त्यांना मनपा आयुक्त आणण्याचे प्रयत्न होत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
चांगला आयुक्त देणार
नवीनआयुक्त कोण यावर लवकरच निर्णय होईल. पण कामांना गती देणारा चांगला आयुक्त शहरास देऊ. रामदासकदम, पालकमंत्री