आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनील केंद्रेकर म्हणतात, मी सर्व प्रकारचे साप पकडण्यात तरबेज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मनपाच्या आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारणारे सुनील केंद्रेकर म्हणजे राहणी साधी तरीही कणखर अन् दृढ आत्मविश्वास बाळगणारे व्यक्तिमत्त्व आहे. ‘अहंकाराचा वारा लगे माझिया शरीरा’ हेच त्यांचे तत्त्व असल्याचे त्यांचे कुटुंबीय अन् मित्रपरिवार सांगतो. सुटीच्या दिवशी शेतात बाजेवर झोपल्यावर टेन्शन फ्री व्हायला आवडते. जंगल भ्रमंतीची आवड असलेले केंद्रेकर सर्व प्रकारचे सापही पकडण्यातही तरबेज आहेत.

सामान्य माणसे त्यांना ‘सिंघम’ म्हणतात. कडक, कणखर प्रशासकीय अधिकारी अशी त्यांची ख्याती अाहे. आतापर्यंतची त्यांची कारकीर्द असामान्य असली तरी खासगी आयुष्यात त्यांना अति सामान्य राहावयास आवडते. प्रचंड व्यस्ततेतून वेळ काढून त्यांना सामान्य नागरिकासारखे जीवन जगायला आवडते. कामाचा शीण आला की ते त्यांच्या मूळ गावी म्हणजे परभणीनजिकच्या झरी गावातील शेतात जातात. तेथे बाजेवर ताणून देत तणावमुक्त होतात. ठेचा-भाकरी हा त्यांचा आवडता खाद्यपदार्थ.

वैयक्तिक माहिती...
-वय: ५१वर्षे, शिक्षण: बी.ई.(मेकॅनिकल) एलएलबी
-मुलगा: प्रजन्यकेंद्रेकर, बी. ई. (मेकॅनिकल), खासगी नोकरी
-पत्नी: धनश्रीकेंद्रेकर, गृहिणी, शिक्षण : एलएलबी
-छंद: क्रिकेट,कार ड्रायव्हिंग, जंगल भ्रमंती, साप पकडणे, भारतीय वंशाची झाडे लावणे
-आवडतालेखक : मारुतीचितमपल्ली
-शाळा: नूतनविद्यालय, परभणी.
महाविद्यालय:अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद.

कामाला दिवसातील २४ तासही पुरत नाहीत
केंद्रेकर हे मुळात शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे ते शेतीत नवनवे प्रयोग करतात. कामाच्या व्यापातून वेळ काढत जंगलभ्रमंती करणे त्यांचा आवडता छंद आहे. कोणत्याही जातीचा साप ते अगदी सहजपणे पकडू शकतात. केंद्रेकर साहेब कधी रिकामा वेळ घालवत नाहीत. त्यांना दिवसाचे २४ तासही पुरत नाहीत, अशी गोड तक्रार घरच्यांसह सहकारी, मित्रांची असते.

गाजावाजा करता मदत
केंद्रेकर म्हणजे लोकांच्या मदतीला धावून जाणारा अधिकारी. याचे मूळ त्यांच्या गावाकडच्या मातीत सापडते. कुणी गरीब त्यांच्याकडे आला की, त्याला मदत करतात.

प्रचंड कामाचा व्याप सांभाळून केंद्रेकर हे क्रिकेटचा छंद अजूनही जोपासतात. मनपात येण्याआधी ते एका २२ वर्षांच्या सिडकोतील कर्मचाऱ्यासोबत क्रिकेटच्या मॅचचे नियोजन करत होते.