आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहरातील ४३ पेट्रोल पंपांना महापालिकेकडून नोटिसा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील ४३ पेट्रोल पंपचालकांनी केंद्र सरकारने निश्चित केलेल्या पेट्रोलियम तथा विस्फोटक सुरक्षा संघटनेचे सुरक्षेचे प्रमाणपत्र घेतलेले आहे. त्यानंतरही या पंपचालकांना मनपाच्या अग्निशमन विभागाच्या वतीने नोटिसा देण्यात आल्याचे समोर आले आहे.
महानगरपालिकेकडून जिल्हा परिषद मैदानावर लागलेल्या फटाक्याच्या आगीच्या दुर्घटनेनंतर सुरक्षेच्या दृष्टीने पाऊले उचलली जात आहेत. याचाच एक भाग म्हणून अग्निशामक विभागाचा परवाना असलेल्या सर्व संस्था, व्यावसायिक संकुल, मोठ्या इमारती, हॉटेल, रेस्टॉरंट, लॉज, केरोसिन दुकाने, फटाका दुकाने, मंगल कार्यालये, तसेच पेट्रोल पंपांची फेर तपासणी करण्यात येत आहे. त्यासाठी सरसकट सर्वांनाच नोटिसा देण्यात आल्या आहेत. यात मागील आठ दिवसांत पेट्रोल पंपांना नोटिसा बजावल्या आहेत.

यावर पेट्रोल पंपचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे अग्निशमन विभागाचे प्रभारी प्रमुख जफर खान यांच्यासह पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यात असोसिएशनने आमच्याकडे थेट केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या संस्थेचीच परवानगी असून सुरक्षेच्या सर्व सुविधा उपलब्ध असल्याचे सांगितले.

आतापर्यंत लागलेल्या आगीचे प्रकार हे टँकर घेण्यात येणाऱ्या नमुन्यांच्या डब्यांमुळे घडले आहेत. त्यात जाफर गेट आणि शहागंज येथील पेट्रोल पंपचा समावेश असल्याचे उदाहरणेही या वेळी असोसिएशनच्या वतीने देण्यात आली. त्यानंतरही मनपाला परवान्यांची सक्ती करायचीच असले तर त्यांनी थेट कंपनीशी संपर्क साधण्याचे असोसिएशनने स्पष्ट केले.

परवाना आहे
^शहरातील सर्वच पेट्रोल पंप कंपन्यांचे असल्यामुळे पाण्याऐवजी सुरक्षेसाठी आवश्यक फोम, पावडर आणि अन्य साहित्याचा उपयोग करण्यात येतो. त्यासाठी केंद्र शासनाच्या कंपनीकडून आम्हाला प्रमाणपत्र देण्यात येते. त्यामुळे महानगरपालिकेने आमच्यावर सक्ती करू नये. -अखिल अब्बास, सचिव, पेट्रोल डिलर्स असोसिएशन.
बातम्या आणखी आहेत...