आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठकीस खैरेंनी पदाधिकाऱ्यांना डावलले, सभागृह नेत्यांचा घरचा आहेर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- समांतर भूमिगत गटार या योजनांचा निधी केंद्राने कपात केल्याचे समोर आल्यावर आज खासदार चंद्रकांत खैरे यांनी संबंधित ठेकेदार मनपाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांना आपण केंद्राकडून निधी आणू, काम बंद करू नका, अशा सूचना दिल्या.
मात्र मनपाच्या एकाही पदाधिकाऱ्याला निमंत्रण नसल्याने पदाधिकारी नाराज झाले असून मनपाशी संबंधित विषयांचे निर्णय आम्हीच घेणार असल्याने आम्हाला अशा बैठकांना बोलावून खासदारांनी काय साधले, असा घरचा आहेर सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांनी दिला. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली.
केंद्र सरकारने आधीच्या यूपीए सरकारच्या काळात मनपासाठी मंजूर केलेल्या भूमिगत गटार योजनेच्या निधीतील आपला वाटा १०९ कोटींनी कमी केला आहे, तर समांतरमधूनही केंद्र आपला वाटा कमी करण्याच्या तयारीत आहे. याबाबतच्या बातम्या प्रकाशित झाल्यानंतर मनपाचे पदाधिकारी या योजनांच्या भविष्याबाबत चिंतित झाले असून सरकारकडे धाव घेत निधीबाबत मागणी करण्याची तयारी चालवली आहे. मनपाचे हे प्रयत्न सुरू असताना आज खासदार चंद्रकांत खैरे यांनी महापालिका, समांतर भूमिगत योजनेच्या अधिकाऱ्यांची एक बैठक बोलावली होती. सुभेदारी विश्रामगृहावर झालेल्या या बैठकीला मनपाचे अधिकारी समांतर-भूमिगतचे अधिकारी खासदार खैरे यांचे निकटवर्ती नगरसेवक यांचीच उपस्थिती होती.

वास्तविक या बैठकीला मनपाचे महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, स्थायी समिती सभापती यापैकी कोणालाच बोलावण्यात आले नाही. त्यामुळे खासदार खैरे यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले कोणत्याही परिस्थितीत या कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे सांगितले. खूप प्रयत्नांनी या योजना शहरासाठी मिळाल्या आहेत, त्या निधी नाही म्हणून रखडू देऊ नका. या योजनांना निर्धारित निधी मिळावा यासाठी बुधवारी अथवा गुरुवारी केंद्रीय नागरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांना भेटणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

परस्पर बैठक बोलावणे योग्य नाही
यासंदर्भात सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, खासदार खैरे ज्येष्ठ नेते आहेत, पण मनपाशी संबंधित जे विषय आहेत त्याबाबत मनपाच्या पदाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे त्यांनी बैठकीला बोलावून काय साध्य केले, असा टोला त्यांनी लगावला.
भाजपचे शहराध्यक्ष भगवान घडामोडे उपमहापौर प्रमोद राठोड यांनीही नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, आम्ही या मनपाचे पदाधिकारी आहोत. जर योजनांबाबत काही निर्णय घ्यायचे असतील तर केवळ अधिकाऱ्यांना बोलावून कसा निर्णय घेतला जाऊ शकतो, पदाधिकारी सोबत असतील तर विषय लगेच मार्गी लागू शकतात. आम्हाला बैठकीला निमंत्रण देता या विषयावर परस्पर बैठक बोलावणे योग्य नसल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.