औरंगाबाद- विधानसभा निवडणुकीच्या व्यापातून मोकळ्या झालेल्या मनपाच्या पदाधिका-यांनी आज मनपात बैठकांचा धडाकाच लावला. या बैठकीतून त्या बैठकीत अशी अधिका-यांची पळापळ झाली. महापौरांनी सफाई कर्मचा-यांच्या सुटीच्या पैशांच्या प्रश्नावर बैठक घेतली, तर उपमहापौरांनी फिश मार्केटच्या कामाबाबत बैठक बोलावली. स्थायी समिती सभापती विजय वाघचौरे यांनी क्रांती चौक ते रेल्वेस्टेशन रस्ता व्हाइट टॉपिंगसंदर्भात बैठक बोलावली. या सर्व बैठकांचे फलित तत्काळ निघाले नसून पुढच्या वायद्यांवरच त्या संपल्या.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली आणि मनपा सुनसान झाली होती. शहरात साफसफाई, आरोग्य, खड्डे, रस्ते, पाणी, पथदिवे असे सारे प्रश्न वासून असताना निवडणुकीच्या काळात एकाही पदाधिकाऱ्याला शहराकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. आता निवडणुकीची धामधूम आणि नंतरचा श्रमपरिहार आटोपून सारे पदाधिकारी मनपात परतले आहेत. त्यात आता नवीन राजकीय संघर्षाचीही भर पडली असून कामात राजकीय कुरघोडीचे विषय या काळात दिसणार आहेत.
ठकीतील चर्चा : २०१०पासून फिश मार्केटच्या उभारणीचे गुऱ्हाळ सुरू आहे. केंद्र सरकारच्या ९० टक्के अनुदानातून कोटी ८४ लाख ५९ हजार रुपयांचा हा प्रकल्प होणार आहे. यासाठी शहागंजात काम सुरू असून तेथे दुमजली मार्केट उभारले जात आहे. त्यात एक बर्फाचा कारखाना, मासे सुरक्षित ठेवण्यासाठी शीतगृह, ५० गाळे असणार आहेत. प्रकल्प रेंगाळल्याने निधी परत जाण्याची वेळ आली होती. पण ती नामुष्की टळली. आता काम मंदगतीने सुरू आहे. बांधकाम झाले आहे, त्यात काही त्रुटी निघाल्या. शिवाय दोन टप्प्यांत शीतगृहाची यंत्रसामग्री आली. पण गाडे अद्याप तिथेच आहे. उपमहापौर संजय जोशी यांनी हे काम वेगात करण्याच्या सूचना करतानाच राज्याचे नवीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना उद््घाटनाला बोलावणार असल्याचे सांगत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. या शिवाय राहिलेले काम तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
विषय : क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन रस्ता व्हाइट टॉपिंगची रखडलेली कामे
कारण: बाळासाहेबठाकरे यांचे नाव देण्यात आलेला रस्ता राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा असल्याने मनपा निवडणुकीच्या आधी तरी तो पूर्ण करून घेण्याची धडपड
विषय : सफाईकर्मचाऱ्यांच्या सुट्यांच्या मोबदल्याचा प्रश्न
कारण: दिवाळीच्याकाळात या कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक सुट्यांचा मोबदला द्यावा या मागणीसाठी काम बंद आंदोलन केले होते. त्यात उपमहापौर संजय जोशी यांनी मध्यस्थी करून ते मिटवले होते.
बैठकीतील चर्चा : महापौरांनीआज याबाबत बैठक बोलावली. या कर्मचाऱ्यांना सुट्यांच्या मोबदल्यापोटी प्रत्येकी चार हजार रुपये देण्याचा निर्णय झाला असला तरी त्याची अंमलबजावणी झाल्याने महापौरांनी प्रशासन लेखा विभागातील अधिकाऱ्यांना बोलावून त्यांची कान उघाडणी केली. कर्मचाऱ्यांना पैसे देणे जरुरी आहे. त्याबाबत काय करणार आहात असे महापौरांनी विचारले. त्यावर अधिकाऱ्यांनी प्रत्येकी चार हजार रुपये देण्याचा निर्णय झाला असला तरी हजेरीनुसार ही रक्कम असल्याने त्याची थोडी पडताळणी करणे आवश्यक आहे. नसता हजेरीनुसार काहींना कमी काहींना जास्त पैसे जातील नंतर आॅडिटमध्ये विषय निघेल अशी भीती अधिका-यांनी व्यक्त केली.
बैठकीतील चर्चा : क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन रस्त्याचे काम दोन महिन्यांपासून थांबले आहे. वन विभागासमोर खोदून ठेवलेल्या रस्त्यामुळे अपघात होऊन दोनच दिवसांपूर्वी एका तरुणीचा मृत्यू झाला. त्या आधीही व्हिट्स हाॅटेलसमोरच्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला होता. या रस्त्यावर दिवे नाहीत, दुभाजकांचे काम झालेले नाही, जेथे खोदकाम झालेले नाही तेथे वाहनधारकांना सूचित करणारे अडथळे अथवा फलक नाहीत. याशिवाय काम ठप्प झाल्याने या संपूर्ण मार्गावर सतत अपघात होत असतात. व्यापारी वर्गाचे अतोनात नुकसान होत आहे. त्यावर मनपाचे अभियंते, संबंधित कामाचे प्रकल्प सल्लागार, विद्युत विभागाचे अभियंते यांनी
आपापल्या अडचणी सांगितल्या. पैसे मिळाल्याने ठेकेदाराने काम बंद केल्याचे सांगण्यात आले. व्हाइट टॉपिंगचे कामही ठप्प झाल्याचे सभापती म्हणाले.